ETV Bharat / briefs

वर्धा: कंत्राटाच्या वादावरून 'त्या' विस्तार अधिकऱ्यावर हल्ला, तिघांना अटक - Extension officer attacked wardha

वर्धा पंचायत समितीत विस्तार अधिकारी म्हणून हेमंत देवतळे कार्यरत आहे. 9 जूनला घरात असताना कुणाल इखार नामक व्यक्तीने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला होता. यात हेमंत देवतळे थोडक्यात बचावले होते.

Extension officer attacked wardha
Extension officer attacked wardha
author img

By

Published : Aug 1, 2020, 8:27 PM IST

वर्धा- वर्ध्या पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यावर 9 जुनला घरात घुसून चाकूने हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी तांत्रिक पुराव्याच्या आधारे तिघांना अटक केली आहे. याचा मुख्य सूत्रधार हा जिल्हा परिषदेत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आजूबाजूला असणारा अमोल वनकर असल्याने खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषदेत कोरोना काळात साहित्य पुरवण्याच्या कंत्राटावरून हा हल्ला झाल्याचे पुढे आले. सुरवातील हा हल्ला जखमी करण्याच्या उद्देशाने झाला असावा असे वाटत होते. मात्र रामनगर पोलिसांनी केलेल्या तपासात हा हत्येचा कट असल्याचे उघडकीस आले.

वर्धा पंचायत समितीत विस्तार अधिकारी म्हणून हेमंत देवतळे कार्यरत आहे. 9 जूनला घरात असताना कुणाल इखार नामक व्यक्तीने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला होता. यात हेमंत देवतळे थोडक्यात बचावले होते. हल्लेखोर इखार याच्यावर जिवे मारण्याच्या प्रयत्नाचे गुन्हे असून तो सराईत गुन्हेगार आहे. रामनगर पोलिसांनी विस्तार अधिकारी हेमंत देवतळेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला होता व कुणाल इखार याला ताब्यात घेतले होते.

त्यानंतर तब्बल 50 दिवसांच्या कालावधी नंतर तांत्रिक पुरावे, तसेच कुणाल इखारकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, शेख ताहीर अब्दुल गफार, ज्याची आधीच पोलिसांच्या रेकॉर्डवर गुन्हेगार म्हणून नोंद आहे, त्याने कुणाल इखार याला 40 हजार रुपयात हत्येची सुपारी दिल्याचे उघडकीस आले. हा कट जिल्हा परिषदेत वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत राहणारा अमोल वनकर याच्या सांगण्यावरून रचला असल्याचे तपासात पुढे आले. यात तांत्रिक पुरावे मिळाल्याने तिघांवर हत्येचा कट रचून जिवे मारण्याची सुपारी दिल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

केवळ 40 हजारात जिवे मारण्याचा कट

मारेकरी कुणाल इखार याला ऑटो घेण्यासाठी पैशांची गरज होती. तो शेख ताहीर अब्दुल गफार याच्याकडे उधार पैसे मागण्यासाठी गेला होता. गफार याने कुणालला हत्येची सुपारी देऊन त्यास तयार केल्याने हा हल्ला करण्यात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मूख्य सूत्रधार, जिल्हा परिषदेतील सेटिंग मास्टर पोलिसांच्या जाळ्यात

मुख्य सूत्रधार अमोल वनकरचे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांसोबत चांगले संबंध होते. यात आर्थिक व्यवहारातून कंत्राट मिळवून देणे असो की, सेटिंग करून देणे, यात अमोल वनकर याचा हातकंडा असल्याचे बोलले जात आहे. या घटनेत अमोल वनकर याला अटक करण्यात आल्याने जिल्हा परिषदेत चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे. हा वनकर कोण? कोणाशी संबंध ठेवून कंत्राट घेण्यासाठी तो काय काय करत होता, याचा तपास होणे बाकी आहे. शिवाय हा कट विस्तार अधिकारी हेमंत देवतळे यांच्या विरोधात नेमक्या कोणत्या कंत्राटामुळे रचण्यात आला, याचा तपास रामनगर पोलीस करत आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, यांच्या मार्गदर्शनात व पीयूष जगताप यांच्या नेतृत्वात रामनगरचे ठाणेदार धनाजी जळक, एपीआय संजय मिश्रा, पोलीस कर्मचारी कमलेश बडे, संदीप खरात, अनिल चव्हाण, लोभेश गाडगे यांनी केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.