सातारा - जिल्ह्यात शुक्रवारी तब्बल 2 हजार 493 नागरिकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. तर 32 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, डाॅ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली.
फलटणमध्ये लक्षणीय वाढ -
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे -
जावली 128 (4824), कराड 212 (15714), खंडाळा 144 (6315), खटाव 309 (8906), कोरेगांव 251 (8680), माण 185 (6136), महाबळेश्वर 35 (3339), पाटण 124 (4229), फलटण 389 (13059), सातारा 466 (23617), वाई 221 (7889 ) व इतर 29 (573), असे एकूण 1 लाख 3 हजार 281नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे
मृतांची संख्या रोखण्याचे आव्हान -
शुक्रवारी मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे - जावली 1 (103), कराड 4 (432), खंडाळा 0 (82), खटाव 5 (253), कोरेगांव 2 (233), माण 5 (141), महाबळेश्वर 1 (31), पाटण 1 (118), फलटण 3 (184), सातारा 7 (733) व वाई 3 (186), असे जिल्ह्यामध्ये एकूण 2 हजार 496 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.