ETV Bharat / briefs

नवी मुंबईत आज 202 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; आतापर्यंतचा सर्वाधिक रुग्ण संख्येचा आकडा

कोरोनामुळे आज 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबईमध्ये गेल्या 10 दिवसात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आत्तापर्यंत नवी मुंबईत 4 हजार 402 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

New Mumbai municipal corporation
New Mumbai municipal corporation
author img

By

Published : Jun 18, 2020, 5:12 PM IST

मुंबई- नवी मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सद्यस्थितीत नवी मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 4 हजारपुढे गेला असून आज चक्क 202 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. ही एका दिवसातील सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. तसेच, काही दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढतच आहे. आज 62 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

कोरोनामुळे आज 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबईमध्ये गेल्या 10 दिवसात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आत्तापर्यंत नवी मुंबईत 4 हजार 402 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी 11 हे इतर ठिकाणचे रहिवाशी होते. आत्तापर्यंत नवी मुंबईत 16 हजार 18 लोकांची कोविड-19 चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये 11 हजार 20 जण निगेटिव्ह आले असून 607 जणांचे तपासणी अहवाल येणे प्रलंबित आहेत.

सद्यस्थितीत नवी मुंबई शहरात राहणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 4 हजार 391 इतकी आहे. आज 202 जण कोरोना पॉझिटिव्ह आले असून यात तुर्भेमधील 19, बेलापूरमधील 15, कोपरखैरणेमधील 33, नेरुळमधील 16, वाशीतील 13, घणसोलीमधील 37, ऐरोलीमधील 46, दिघ्यातील 23 असे एकूण 202 नवे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. या रुग्णांमध्ये 82 स्त्रिया व 120 पुरुषांचा समावेश आहे. आत्तापर्यंत नवी मुंबईत 2 हजार 519 व्यक्ती कोरोनामुक्त झाले असून ते बरे होऊन घरी परतले आहेत.

तर आज बेलापूरमधील 5, नेरूळमधील 9, वाशीमधील 1, तुर्भेमधील 13, कोपरखैरणेमधील 12, घणसोलीमधील 5, ऐरोलीमधील 9, दिघा 8 अशा एकूण 62 व्यक्ती आज कोरोनामुक्त झाल्या असून ते घरी परतले आहेत. यामध्ये 22 स्त्रिया आणि 40 पुरुषांचा समावेश आहे. शहरात सद्यस्थितीमध्ये 1 हजार 734 व्यक्तींवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. आतापर्यंत एकूण 138 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.