ETV Bharat / briefs

अमरावती : अंजनगाव सुर्जी येथे लवकरच 20 ऑक्सिजन बेडची व्यवस्था - 20 oxygen bed set up in anjangaon surji

गत दोन-तीन दिवसांपासून आमदार बळवंत वानखडे पांढरी येथील कोविड सेंटरच्या सुविधेबाबत प्रयत्नशील होते.

Anjangav surji
अंजनगाव सुर्जी
author img

By

Published : May 5, 2021, 12:22 PM IST

अमरावती - जिल्हाधिकारी शैलेश नवल यांनी अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी येथे असलेल्या कोविड सेंटरला दुपारी दोन वाजेच्या दरम्यान भेट देऊन पाहणी केली. तेथील अडीअडचणी जाणून घेऊन प्रश्न सोडविण्यासाठी उपयोजना करण्यात येऊन लवकरच येथे 20 ऑक्सिजनयुक्त बेडची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार बळवंत वानखडे यांचे प्रयत्न -

गत दोन-तीन दिवसापांसून आमदार बळवंत वानखडे पांढरी येथील कोविड सेंटरच्या सुविधेबाबत बाबत प्रयत्नशील होते. पांढरी येथील कोविड सेंटरमध्ये त्वरित 20 ऑक्सिजनयुक्त बेडची, तसेच औषधी, सेंटरला डॉक्टर, परिचारिका, देण्याबद्दल आदी विषयांवर आमदार बळवंत वानखडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सोबत चर्चा करून सदर सेंटरला तातडीने व्यवस्था करण्याची मागणी जिल्हाधिकार्‍यांना केली.

नियमित व स्वतंत्र वैद्यकीय यंत्रणा -

जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित सेंटर व त्वरित व्यवस्था केल्या जाणार असल्याचे याप्रसंगी सांगितले. कोरोना रुग्ण अधिक गंभीर असल्यास त्याची व्यवस्था दर्यापूर येथील कोविड हॉस्पिटलला करण्यात येईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच या सेंटरला विद्युत पुरवठा खंडित झाल्यास पर्यायी व्यवस्था नसल्याने नगरपालिकेच्या माध्यमातून करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी शैलेश नवल यांनी दिल्या. तसेच या कोविड सेंटरला स्वतंत्र नियमित डॉक्टर व परिचारिका देण्यात याव्या, अशा सूचना तालुका वैद्यकीय अधिकारी सुधीर डोंगरे यांना करण्यात आल्या.

यांची होती उपस्थिती -

यावेळी उपविभागीय अधिकारी लोणारकर, तहसीलदार वैशाख वाहुरवाघ, आजच नविन रजू झालेले तहसिलदार अभिजित जगताप, बिडिओ पवार साहेब, तालुका वैद्यकीय अधिकारी सुधीर डोंगरे, मुख्याधिकारी सुमेध अलोने, तालुका वैद्यकीय अधिकारी डोंगरे, नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे, पं.स. सदस्य नितिन पटेल, सरपंच पुरूषोत्तम घोगरे, आदी. उपस्थित होते.

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.