मुंबई- कोरोनाचे मुंबईत आज 1 हजार 115 नवे रुग्ण आढळून आले असून 57 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 9 हजार 96 इतका झाला आहे, तर मृतांचा आकडा 6 हजार 90 वर पोहोचला आहे.
मुंबईत आज 1 हजार 361 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत आतापर्यंत एकूण 80 हजार 238 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने सध्या 22 हजार 768 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईमधील रुग्ण बरे होण्याचा दर 73 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 67 दिवसांवर पोहोचला आहे.
कोरोना विषाणूमुळे मुंबईत आज 57 जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी 41 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 35 पुरुष तर 23 महिला रुग्ण आहेत. मुंबईतून आज 1 हजार 361 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 80 हजार 238 वर पोहोचला आहे. मुंबईत कोरोनाचे 1 लाख 9 हजार 96 रुग्ण असून 80 हजार 238 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 73 टक्क्यांवर पोहोचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 67 दिवस, तर सरासरी दर 1.06 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 630 चाळी आणि झोपडपट्टी प्रतिबंधित क्षेत्रे म्हणून घोषित करण्यात आले असून त्या सील करण्यात आल्या आहेत. तसेच 6 हजार 18 इमारती व त्यांच्या विंग सील करण्यात आल्या आहेत. कोरोनाचे निदान करण्यासाठी 4 लाख 78 हजार 825 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.