ETV Bharat / bharat

इंदिरा गांधींच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारे होणार मिझोरमचे मुख्यमंत्री; जाणून घ्या, लालदुहोमा यांच्याबद्दल

Mizoram Chief Minister : माजी आयपीएस अधिकारी लालदुहोमा यांच्या पक्षानं मिझोरममध्ये इतिहास रचला आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला प्रचंड बहुमत मिळालं. आता ते राज्याचे पुढील मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे.

Lalduhoma
Lalduhoma
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 4, 2023, 4:46 PM IST

नवी दिल्ली Mizoram Chief Minister : मिझोरममध्ये लालदुहोमा यांचा पक्ष झोरम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) ला प्रचंड बहुमत मिळालं आहे. ४० सदस्यांच्या विधानसभेत त्यांच्या पक्षाला २७ जागांवर विजय मिळाला. ७४ वर्षीय लालदुहोमा हे माजी आयपीएस अधिकारी आहेत. १९८४ मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यापूर्वी ते तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सुरक्षेत तैनात होते.

पंतप्रधानांच्या सुरक्षा दलात होते : आयपीएस अधिकारी म्हणून लालदुहोमा यांनी गोव्यात तस्करांविरुद्ध दीर्घ लढा दिला होता. त्यांच्या कार्यानं प्रभावित होऊन त्यांना पंतप्रधानांच्या सुरक्षा दलात स्थान देण्यात आलं. तेव्हापासून त्यांचा राजकारणात रस वाढू लागला. कालांतरानं, लालदुहोमा यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांची मिझोरम काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

मिझो नॅशनल फ्रंटला मुख्य प्रवाहात आणलं : लालदुहोमा जेव्हा राजकारणात आले, तेव्हा मिझो नॅशनल फ्रंटनं भारत सरकारच्या विरोधात भूमिका घेतली होती. दोघांमध्ये शांतता करार करण्यात लालदुहोमा यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या प्रयत्नांमुळेच मिझो नॅशनल फ्रंटचे नेते लालडेंगा मुख्य प्रवाहात परतले. मात्र, ज्या दिवशी लालडेंगा आणि इंदिरा गांधी यांची भेट होणार होती, त्याच दिवशी इंदिरा गांधींची हत्या झाली.

'झेडपीएम'ची स्थापना : दोन वर्षांनंतर १९८६ मध्ये लालदुहोमा यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी मिझो नॅशनल युनियन आणि मिझोरम पीपल्स कॉन्फरन्सची स्थापना केली. २०१८ मध्ये त्यांना नव्या युतीची घोषणा केली. त्याला 'झोरम पीपल्स मूव्हमेंट' म्हणजेच 'झेडपीएम' असं नाव देण्यात आलं. याची नोंदणी २०१९ मध्ये झाली. मात्र २०२० मध्ये त्यांना पक्षांतर विरोधी कायद्याअंतर्गत आमदार पदाचा राजीनामा द्यावा लागला.

मुख्यमंत्री होण्याची शक्यता : लालदुहोमा तेव्हा म्हणाले होते की, त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्यावेळी त्यांचा पक्ष नोंदणीकृत नव्हता. नंतर त्यांच्या पक्षाची नोंदणी झाली. त्यामुळे त्यांनी नव्या पक्षात प्रवेश केला. पण त्यांचा युक्तिवाद चालला नाही आणि अखेर त्यांना राजीनामा द्यावा लागला. आज लालदुहोमा मिझोरमचे मुख्यमंत्री होण्याच्या अगदी जवळ आले आहेत.

हेही वाचा :

  1. भाजपाचा असा नेता ज्यानं एकाच वेळी दिला विद्यमान अन् भावी मुख्यमंत्र्याला धोबीपछाड!
  2. ABVP सदस्य ते तेलंगणात कॉंग्रेसच्या मुख्यमंत्री पदाचे दावेदार! असा आहे रेवंत रेड्डी यांचा प्रवास
  3. साडेसहाव्या वर्षी घर सोडलं, आता राजस्थानमध्ये भाजपासाठी गेमचेंजर! जाणून घ्या कोण आहेत बाबा बालकनाथ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.