ETV Bharat / bharat

झेलेन्स्की यांच्याकडून युद्ध संपवण्याची तयारी; पुतीन यांना भेटीची केली मागणी - झेलेन्स्की यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांची भेट घेतली

युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन आणि संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांची भेट घेतली. ( Zelensky Calls For Putin Visit To End War ) राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या कार्यालयाने रविवारी ही माहिती दिली आहे. तसेच, झेलेन्स्की यांनी शनिवारी रशियाचे नेते व्लादिमीर पुतिन यांच्याशी 'युद्ध संपवण्यासाठी' भेटीची मागणी केली असल्याची माहितीही समोर आली आहे.

झेलेन्स्की यांच्याकडून युद्ध संपवण्याची तयारी

author img

By

Published : Apr 25, 2022, 10:28 AM IST

किव - युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन आणि अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांची भेट घेतली. राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या कार्यालयाने रविवारी ही माहिती दिली. 24 फेब्रुवारी रोजी युक्रेनवर रशियन आक्रमण सुरू झाल्यापासून झेलेन्स्की आणि यूएस अधिकार्‍यांमध्ये कीवमधील ही पहिली बैठक होती. ( Zelensky Calls For Putin ) व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी या भेटीबद्दल ट्विट केले आणि असे लिहिले की, "आज युक्रेनियन लोक एकजूट आणि मजबूत आहेत आणि युक्रेन-यूएस मैत्री आणि भागीदारी पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आहे!" अस त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

अधिक शक्तिशाली शस्त्र हवे - राष्ट्रपतींचे सहाय्यक ओलेक्सी एरेस्टोविच यांनी रविवारी (YouTube)वर दिलेल्या मुलाखतीदरम्यान बैठकीची पुष्टी केली. ते म्हणाले की "अध्यक्षांशी बोलणे, कदाचित ते मदत करू शकतील." झेलेन्स्की यांनी शनिवारी सांगितले की वॉशिंग्टनने आतापर्यंत युक्रेनला दिलेल्या मदतीबद्दल कृतज्ञ आहे. आजतरी रशियन सैन्याविरूद्ध वापरण्यासाठी अधिक शक्तिशाली शस्त्र हवे आहेत असही ते म्हणाले आहेत.

पुतीन यांना भेटण्यास आपण घाबरणार नाहीत - युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी शनिवारी रशियाचे नेते व्लादिमीर पुतिन यांच्याशी 'युद्ध संपवण्यासाठी' भेटीची मागणी केली आहे. ते येथील मेट्रो स्टेशनवर पत्रकार परिषदेत बोलत होते. 'मला वाटते की हे युद्ध ज्याने सुरू केले आहे, तोच हे युद्ध संपवू शकतो अस ते म्हणाले आहेत' रशिया आणि युक्रेन यांच्यात शांतता करार झाल्यास पुतीन यांना भेटण्यास आपण घाबरणार नाहीत. तसेच, सुरूवातीपासूनच मी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना भेटण्याच्या विषयावर जोर दिलेला आहे. असही ते म्हणाले आहेत.

हेही वाचा - LSG vs MI : सलग आठ पराभव! मुंबई इंडियन्सवर लखनौ जायंट्सचा दणदणीत विजय

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.