ETV Bharat / bharat

attack on nupur sharma supporter: सीतामढीमध्ये नुपूर शर्मा यांचा व्हिडिओ पाहत असताना तरुणावर चाकूने हल्ला - Youth attacked with knife while watching Nupur Sharma video

बिहारच्या सीतामढीमध्ये उदयपूरसारखी घटना घडली आहे. तिथे नुपूर शर्माला पाठिंबा देणाऱ्या तरुणावर काही लोकांनी चाकूने हल्ला केला (Youth Attacked With Knife while Watching Nupur Sharma Video). जखमी तरुणाच्या वडिलांनी मात्र पोलिसांवर आरोप केला आहे. त्यांच्यामते पोलिसांनी सामान्य प्रकरण म्हणून याची नोंद केली तसेच नुपूरचे नाव न घेण्यास सांगितले.

सीतामढीमध्ये नुपूर शर्मा यांचा व्हिडिओ पाहत असताना तरुणावर चाकूने हल्ला

author img

By

Published : Jul 19, 2022, 10:22 AM IST

दरभंगा/सीतामढी: भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या कथित वादग्रस्त विधानाला दीड महिना उलटून गेला आहे. तरी हे प्रकरण थंड होण्याचे नाव घेत नाही. ताजे प्रकरण सीतामढी जिल्ह्यातील नानपूर पोलीस स्टेशन (Nanpur Police Station) क्षेत्रातील बहेरा जाहिदपूर गावातील आहे. एका तरुणाला (Attack on Nupur Sharma Supporter in Sitamarhi) काही मुलांनी चाकूने वार केले. कारण तो आपल्या मोबाईलमध्ये नुपूर शर्माचे स्टेटस पाहत होता. या घटनेत अंकित गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी दरभंगा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

सीतामढीमध्ये नुपूर शर्मा यांचा व्हिडिओ पाहत असताना तरुणावर चाकूने हल्ला

उदयपूरसारखी घटना सीतामढीमध्ये: रुग्णालयात दाखल झालेल्या अंकित या तरुणाने मीडियाला सांगितले की, शनिवारी गावापासून दूर असलेल्या नानपूर येथील एका पानाच्या दुकानात उभा राहून तो त्याच्या मोबाईलमध्ये नुपूर शर्माचा व्हिडिओ स्टेटस पाहत होता. तेव्हा जवळच उभ्या असलेल्या तीन तरुणांनी त्याला हटकले. ते सिगारेट ओढत होते, त्यांनी अडवून विचारले, तू नुपूर शर्माचा समर्थक आहेस का? तुझा याच्याशी काय संबंध आहे, असे सांगताच त्याने सिगारेटचा धूर तोंडावर सोडून मारहाण सुरू केल्याचे अंकितने सांगितले. यादरम्यान त्यांनी चाकू काढून अंकितवर 5 ते 6 वार करून जखमी केले.

"मी माझ्या मोबाईलवर नुपूर शर्माचे स्टेटस पाहत होतो. तेव्हा काही लोक तिथे आले आणि विचारले तू काय पाहत आहेस. तेव्हा मी म्हणालो, तुम्हाला काय करायचे, तर ते म्हणाले कुणाचा सपोर्ट करतोयस. यावर मी म्हणालो की मी हिंदू आहे, नुपूरचे समर्थन करणार. यावरून भांडण सुरू झाले. त्यानंतर त्यांनी माझ्यावर पाठीमागून वार केले. त्यानंतर दोन जण पळून गेले, एकाला आम्ही पकडले होते, त्यानंतर तेथून 20-30 जण आले आणि त्याला घेऊन गेले.'' - अंकित झा, जखमी युवक

तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल: तरुणाचे वडील मनोज झा म्हणाले की, आमच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे, मात्र तो योग्य नाही. ते म्हणाले की, ते लोक पुन्हा आमच्यावर हल्ला करू शकतात. आपल्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षेसाठी तरुणाच्या वडिलांनी पोलिस प्रशासनाकडे मदत मागितली आहे. जखमी तरुणाचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून लोकांमध्ये तो चर्चेचा विषय बनला आहे.

"पान शॉपवरचा माझा मुलगा नूपुर शर्माचे स्टेटस मोबाईलवर पाहत होता. त्याचवेळी नानपूर येथील तीन तरुणांनी आमच्या मुलाशी बाचाबाची केली आणि नंतर त्याच्यावर चाकूने वार करून त्याला जखमी केले. पोलिसांनी माझ्यावर दबाव टाकला आणि त्यांच्यावर गुन्हा नोंदवला. त्यात नुपूर शर्मा प्रकरणाचा संदर्भ वगळण्यात आला आहे. या घटनेनंतर आम्ही खूप घाबरलो आहोत. हल्लेखोर पुन्हा आमच्यावर हल्ला करू नयेत." - मनोज झा, जखमी तरुणाचे वडील

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.