यादगिरी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटकातील यादगिरी येथे 10 हजार 800 कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ केला. त्यानंतर त्यांनी जनतेला संबोधित केले. यादगिरी हे देशातील ऐतिहासिक वारसास्थळ आहे. त्यामुळे तुम्ही येथे दिलेला आशीर्वाद हिच माझी ताकद असल्याचेही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.
विकास कामांचा शुभारंभ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यादगिरी येथे 10 हजार 800 कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ केला. यात जलसिंचनाच्या योजना, पिण्याचे पाणी आणि इतर विकासकामांचा समावेश आहे. पंतप्रधानांनी शुभारंभ केलेल्या या विकासकामांमुळे कोडेकोल आणि यादगिरीतील 3 लाखांपेक्षाही जास्त शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. दुसरीकडे पिण्याच्या पाण्याच्या योजनेमुळे 2 लाख 30 हजार घरांना फायदा होणार आहे. त्यासह पंतप्रधान मोदी यांनी सूरत चेन्नई एक्सप्रेस वे चेदेखील उद्घाटन केले आहे.
कन्नड भाषेतून सुरुवात : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यादगिरी येथे प्रचंड जनसभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी कन्नड भाषेतून आपल्या भाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी यादगिरीच्या पावन भुमीत आलेल्या नागरिकांचा आपल्याला आदर असल्याचे सांगितले. त्यांनी पेंडाल लहान आहे. मात्र तरीही नागरिक कडक उन्हात उभे आहेत. त्यांचे प्रेम मी समजू शकतो अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींना उपस्थित नागरिकांना अभिवादन केले. तुमचे आशीर्वाद हिच आपली ताकद असल्याचाही त्यांनी पुनरुच्चार केला.
यादगिरी ऐतिहासिक वारसा : यादगिरीला ऐतिहासिक वारसा आहे. येथील संस्कृती आणि परंपरा थोर आहे. राजा व्यंकटप्पा नायक यांच्या गौरवशाली इतिहासाचा वारसा या भुमीला लाभल्याचेही ते यावेळी म्हणाले. त्यामुळे या गौरवशाली भुमीला मी वंदन करतो, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. मात्र अगोदरच्या सरकारने या गौरवशाली भुमीचा विकास केला नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
एकॉनॉमिक कॉरिडॉर : सूरत चेन्नई एकॉननॉमीक कॉरिडॉर हा कर्नाटकातून जातो. त्यामुळे हा महामार्ग कर्नाटकच्या विकासाला चालना देणारा ठरणार असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले. कर्नाटकच्या यादगिरी, रायचूर, कलबुर्गी येथील व्यावसाईकांना व्यवसाय करने सोपे होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. कर्नाटकात शुभारंक करण्यात आलेल्या प्रकल्पामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील नागरिकांचे अभिनंदनही केले.
स्वातंत्र्याचा अमृत काळ : कर्नाटकातीलच नाही तर, देशातील प्रत्येक मागास जिल्ह्याचा विकास करण्यात येत आहे. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक कुटूंब आणि प्रत्येक राज्याचा विकास करण्याचे ध्येय हे आमच्या सरकारचे आहे. त्यामुळे आम्ही वोट बँकेचे राजकारण करत नाही. तर विकासाचे राजकरण करत असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले. आगामी काळ हा स्वातंत्र्याचा अमृतकाळ असेल. त्यामुळे 100 जिल्ह्यांपैकी पहिल्या 10 जिल्ह्यांचा 10 महत्वाकांक्षी जिल्ह्यांचा विकास करण्यात येत आहे. यात यादगिरी जिल्ह्याचा समावेश असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आगामी 25 वर्ष हे प्रत्येकासाठी अमृतकाळ असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
11 कोटी कुटुंबाला पाणी : साडेतीन वर्षाअगोदर जल जीवन मिशनची सुरुवात झाली. त्यावेळी 18 कोटी ग्रामीण कुटुंबांपैकी 3 कोटी कुटुंबानांच नळाद्वारे घरात पाणी मिळत होते. मात्र आता 11 कोटी कुटुंबांना घरात पिण्याचे पाणी मिळत असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. डबल इंजिनचे सरकार म्हणजे डबल विकास असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. अगोदरचे सरकार आपल्या जबाबदारीपासून पळ काढणारे होते. मात्र आमच्या डबल इंजिनच्या सरकारने कर्नाटकचा विकास केल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. अगोदरचे सरकारने यादगिरी आणि परिसराला मागास जिल्हा म्हणून घोषित करण्यास टाळाटाळ करुन विकास केला नाही. मात्र आम्ही उत्तर कर्नाटकचा विकास केल्याचा दावाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केला.
हे ही वाचा - Governor Controversial Statement : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यपालांकडून पुन्हा एकेरी उल्लेख