कानपूर - शहरात ठग्गू के लड्डू, बनारसी चाय, ग्रॅज्युएट हेअर सलून यांच्यासारखी अनेक दुकाने पहायला मिळतात. त्यात आता आणखी एका दुकानाची भर पडली आहे. मात्र हे दुकान कानपूर शहरात सध्या जबरदस्त चर्चेत आहे. त्याचे कारणही तसेच आहे. शहरातील एका तरुणाने इंजिनिअरींगचे शिक्षण सोडून समोसा विक्रीचे दुकान सुरू केले. या दुकानात विविध ट्रेडचे समोसे विकले जातात. शहरातील काकदेव परिसरात इंजिनियर समोसा नावाचे हे दुकान आहे. विशेष बाब म्हणजे या दुकानाचा मालक इंजिनीअर आहे.
अभियांत्रिकी केल्यानंतर स्टार्टअपचा निर्णय : दक्षिण कानपूरच्या बरा पोलीस स्टेशन परिसरात अभिषेक कुमार हा राहतो. इंजिनिअरींगचे शिक्षण झाल्यानंतर त्याला आपला व्यवसाय सुरू करायचा होता. अभिषेकने 2016 मध्ये राजस्थान टेक्निकल युनिव्हर्सिटीमध्ये इंजिनीअरिंगला प्रवेश घेतला. 2020 मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने काही दिवस नोकरीही केली. मात्र काहीतरी वेगळे करण्याची इच्छा त्याच्या मनात होती. नोकरी सोडून अभिषेकने समोसा दुकान उघडण्याचा निर्णय घेतला. आज या स्टार्टअपने त्याला एक वेगळी ओळख दिल्याचे अभिषेक सांगतो. यामुळेच या कामात आपण पूर्णपणे समाधानी असल्याचेही तो म्हणाला.
अभियंता समोसे ही संकल्पना कशी सुचली : अभिषेकने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला नोकरीही लागली. मात्र त्याला मानसिक समाधान मिळाले नाही. त्याला आपली वेगळी ओळख बनवायची होती. त्यामुळे त्याने समोसे बनवण्याचा विचार केला. समोसा ही अशी डिश आहे, जी सर्वांनाच आवडते. तसेच अगदी कमी खर्चातही समोसे लोकांना पुरवले जाऊ शकतात. अभिषेक इंजिनियर असल्याने त्याने समोसे दुकानाला इंजिनिअर समोसे दुकान ठेवण्याचे ठरवले. तो अभियांत्रिकी क्षेत्रात काम करत नसला, तरी त्याला त्याची आवड आहे. म्हणून त्याने या दुकानाला 'इंजिनियर समोसा' असे नाव दिल्याचे अभिषेक म्हणाला.
जाणून घ्या समोशामध्ये काय आहे खास : कानपूरचे इंजिनियर समोसे खूप खास आहेत. कानपूर शहरात इंजिनियर समोशांपेक्षा चांगले समोसे कुठे आढळणार नसल्याची माहिती नागरिक देतात. अभियांत्रिकीच्या वेगवेगळ्या शाखा आहेत, त्याप्रमाणे दुकानाच्या नावानुसार समोस्यांची नावे ठेवल्याचे अभिषेक सांगतो. त्यांच्या मेनूमध्ये वेगवेगळ्या समोशांची नावे देण्यात आली आहेत. अभियांत्रिकीमध्ये तुम्हाला इलेक्ट्रिकल ट्रेड आवडत असेल, तर तुम्हाला इथे इलेक्ट्रिकल समोसा मिळेल असेही अभिषेक यावेळी म्हणाला.
दुकानात खास आयटी समोसे : अनेक जणांना आयटी सेक्टरमधून इंजिनीअरिंग करायचे असते. त्यामुळे अशा तरुणांसाठी खास आयटी समोसेही या दुकानात बनवले जातात. तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्समधून इंजिनीअरिंगमध्ये रस असेल तर खास इलेक्ट्रिकल समोसेही तयार केले जातात. बाजारात उपलब्ध असलेल्या समोस्यांचे सारण हे केवळ बटाट्याचे असते, परंतु येथे समोस्यांमध्ये विविध प्रकारचे सारण केले जात असल्याची माहिती अभिषेकने दिली. आपण इलेक्ट्रिकल समोशाची मागणी केली, तर त्यात चीज आणि भाज्या भरल्या जात असल्याचेही तो म्हणाला. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या समोशामध्ये वेगवेगळे सारण करून ते तेलात तळले जाते असल्याचेही त्याने यावेळी सांगितले.
वेगळे नाव आणि चव लोकांना करते आकर्षित : इंजिनिअरींग समोसा त्याच्या अनोख्या नावामुळे लोकांना आकर्षित करतो. या दुकानात येणारा ग्राहक आलोक कुमार याने नावासोबतच येथील विविध प्रकारच्या समोस्यांची चव खूप रुचकर असल्याचे सांगितले. त्यामुळे येथे येऊन समोसे खायला आवडतात असेही तो म्हणाला. या दुकानात चॉकलेट समोसा, मोमोस समोसा, पनीर समोसा, पास्ता समोसा, मंचूरियन समोसा, चीज समोसा यासह अनेक प्रकारचे समोसे उपलब्ध असल्याची माहिती अभिषेकने यावेळी दिली.
हेही वाचा - Mohsin Shaikh Murder Case : मोहसीन शेख खून प्रकरणात काँग्रेस, राष्ट्रवादीने जाणीवपूर्वक अडकवले; धनंजय देसाईंचा आरोप