उत्तर प्रदेश (लखनऊ) - उत्तर प्रदेशचे काळजीवाहू मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आज शुक्रवार (दि. 25 मार्च) दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे आहेत. या शपथविधीसाठी सर्वच राजकीय पक्षातील वरिष्ठ नेत्यांसह, देशातील उद्योगपती, महंत यांच्यासह इतर क्षेत्रातील मान्यवरही उपस्थित राहणार आहेत. यामध्ये कांग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनीया गांधी, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव, बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांना आमंत्रण देण्यात आले आहे. तसेच, देशातील भाजपचे सरकार असेले मुख्यमंत्रीही यावेळी उपस्थित राहणार आहेत.
यूपीमध्ये इतिहास घडवला - लखनौ येथे भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत गुरुवार (दि. 24 मार्च)रोजी योगी आदित्यनाथ यांची एकमताने विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. यानंतर योगी आदित्यनाथ यांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर योगी म्हणाले की, त्यांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली बहुमत मिळवले आणि पक्षाच्या पाठिंब्याने यूपीमध्ये इतिहास घडवला आहे. गुरुवारी संध्याकाळी योगी आदित्यनाथ यांनी राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा केला होता.
मुख्यमंत्री आणि माजी मंत्र्यांना आमंत्रण - योगी आदित्यनाथ यांनी अखिलेश यादव, मुलायम सिंह यादव आणि बसपा अध्यक्षा मायावती यांना वैयक्तिकरित्या फोन करून शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. त्यांच्या भाजपशासित राज्यांतील मुख्यमंत्री आणि माजी मंत्र्यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
अनेक बडे उद्योगपती उपस्थित राहणार - या शपथविधी सोहळ्यासाठी चित्रपट जगतातून अभिनेता आणि काश्मीर फाइल्स चित्रपटाचे खासदार किरण खेर यांचे पती अनुपम खेर यांचीही उपस्थिती असण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमाला अनेक बडे उद्योगपती उपस्थित राहणार आहेत. बाबा रामदेव यांच्यासह सुमारे 300 साधूंना आमंत्रित करण्यात आले होते.
भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार-
- शिवराज सिंह चौहान, मुख्यमंत्री मध्य प्रदेश
- मनोहर लाल खट्टर, मुख्यमंत्री हरियाणा
- पेमा खांडू, मुख्यमंत्री अरुणाचल प्रदेश
- एमएन वीरेन सिंह, मुख्यमंत्री, मणिपुर
- जयराम ठाकुर, मुख्यमंत्री हिमाचल प्रदेश
- विप्लव देवजी, मुख्यमंत्री त्रिपुरा
- प्रमोद सांवत, मुख्यमंत्री गोवा
- हिम्मत विस्वा शर्मा, मुख्यमंत्री असम
- बसवराज बोम्मई, मुख्यमंत्री कर्नाटक
- भूपेन्द्र पटेल, मुख्यमंत्री गुजरात
- पुष्कर सिंह धामी, मुख्यमंत्री उत्तराखण्ड
- तारकेश्वर सिंह, उप-मुख्यमंत्री बिहार
- रेणु देवी, उपमुख्मंत्री बिहार
- वाई पैटन, उपमुख्यमंत्री नागालैंड
- चोनामीन, उपमुख्यमंत्री अरुणाचल प्रदेश
- जिष्णु देव वर्मा, उपमुख्यमंत्री त्रिपुरा
शपथविधी सोहळ्याला उपस्थित उद्योगपती-
- टाटा ग्रुप- एन चन्द्रशेकरन
- अम्बानी ग्रुप- मुकेश अम्बानी
- आदित्य बिरला ग्रुप- कुमार मंगलम बिरला
- अडानी ग्रुप- गौतम अडानी
- महिन्द्रा ग्रुप- आन्नद महिंद्रा
- हीरान्नदानी ग्रुप- दर्शन हीरा न्नदानी
- लुलु ग्रुप- यूसुफ अली
- टोरेंट ग्रुप- सुधीर मेहता
- गोयनंका ग्रुप- संजीव गोयंका
- लोढ़ा ग्रुप- अभिनंद लोढ़ा
हेही वाचा - चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांचे भारतात आगमन