ETV Bharat / bharat

प्रभू श्रीरामावर टीका केल्यास विरोधी पक्षांना राजकीय मोक्ष मिळणार - रामदेव बाबा

योगगुरू रामदेव बाबा राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यात सहभागी होणार आहेत. त्याआधी रामदेव बाबा यांनी विरोधकांना मोठा सल्ला दिला आहे. विरोधी पक्षानं प्रभू श्रीरामावर अशोभनीय टीका करणं टाळावं. अन्यथा टीका करणाऱ्या पक्षाला रामाच्या कृपेनं लवकरच राजकीय मोक्ष मिळेल, असा दावा त्यांनी केलाय.

Ramdev Baba
Ramdev Baba
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 4, 2024, 4:09 PM IST

हरिद्वार (उत्तराखंड) : 22 जानेवारीला अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवर प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. यासाठी योगगुरू रामदेव बाबा, आचार्य बाळकृष्ण यांना उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. याआधी रामदेव बाबा यांनी विरोधी पक्षांना प्रभूश्रीरामावर कोणतीही टीका, टिप्पणी करू नये, असा सल्ला दिलाय. त्यावेळी रामदेव म्हणाले की, रामावर कोणत्याही पक्षानं अशोभनीय टीका, टिप्पणी केल्यास त्यांना लवकरच राजकीय मोक्ष मिळेल.

22 जानेवारीला दीपोत्सव साजरा करा : उत्तर प्रदेश अमरोहा येथील छोटीपुरा गावातील कन्या गुरुकुल महाविद्यालयात महर्षी दयानंद सरस्वती यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त शास्त्र स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाला रामदेव बाबा यांची प्रमुख उपस्थिती होती. भगवान रामाची पूजा केवळ हिंदूच नाही, तर संपूर्ण समाज करतो. पंतप्रधानांच्या आवाहनानुसार 22 जानेवारीला सर्वांनी दीपोत्सव साजरा करावा, असं आवाहन रामदेव बाबा यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केलंय.

न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय : अयोध्येत आधुनिक भारताचा मोठा विक्रम, इतिहास रचला जात आहे. 500 वर्षांच्या संघर्षानंतर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय आला आहे. त्यानंतर आता राम मंदिराचं स्वप्न पूर्ण होत आहे. प्रभू श्रीराम यांचं भव्य मंदिर डोळ्यांसमोर पाहण्याचं सौभाग्य आता आपल्याला मिळणार आहे. त्यांच्या कार्यक्रमात पहिल्यांदाच सहभागी होण्याची संधी मिळणं, ही स्वतःसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे.

राम मंदिर 365 दिवस खुलं : राम सर्वांचे आहेत. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी ज्यांना निमंत्रण मिळालं, त्यांनी जरूर यावं. ज्यांना निमंत्रण मिळालेलं नाही, त्यांच्यासाठी मंदिर वर्षातील 365 दिवस खुलं असणार आहे. राम ही केवळ एक व्यक्ती नसून, राम ही आपली सनातन संस्कृती असल्याचं ते म्हणाले. आमच्यासाठी राम हे राष्ट्रधर्म आहेत. राम आमच्यासाठी स्वाभिमान आहे, त्यामुळं विरोधकांनी कोणतीही टीका, टिप्पणी करु नये, असं रामदेव बाबा यांनी म्हटलंय.

हेही वाचा -

  1. राम दरबार ते सीता कूप, वाचा अयोध्येतील श्रीराम मंदिराची खास वैशिष्ये
  2. वायएस शर्मिला यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश; पक्षही केला विलीन
  3. राम मंदिर उद्घाटनाच्या दिवशी अयोध्येत 'अशी' असेल सुरक्षा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.