नवी दिल्ली - यति नरसिंहानंद सरस्वती यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये नरसिंहानंद सरस्वती सांगत आहेत की (Yeti Narasimhananda Saraswati), हरघर तिरंगा नावाने मोठी मोहीम सुरू आहे. सत्ताधारी पक्ष ही मोहीम राबवत आहे. या मोहिमेला ते विरोध करतात.
मात्र तिरंग्यासाठी सर्वात मोठी ऑर्डर बंगालमधील एका कंपनीला देण्यात आली आहे. ती कंपनी सलाउद्दीन यांच्या मालकीची आहे. ते म्हणाले की, जगातील सर्वात मोठे हे ढोंगी अभियान आहे. या मोहिमेवर (har ghar tiranga abhiyan) बहिष्कार टाकला पाहिजे. घरामध्ये तिरंगा लावायचा असेल तर जुना तिरंगा लावा, असे ते म्हणाले. पण सलाहुद्दीनला एक पैसाही देऊ नका आणि नेत्यांना धडा शिकवा, असे ते म्हणाले.
मात्र, यती नरसिंह आनंद सरस्वती जो दावा करत आहेत, त्या कोणताही पुरावा मात्र त्यांच्याकडे नाही. मात्र त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद नक्कीच निर्माण झाला आहे (Controversial statement of Yeti Narasimhanand Saraswati). यती नरसिंहानंद सरस्वती यांनी हिंदूंना सर्वात मोठे ढोंगी संबोधून त्यांनी हिंदूं विरुद्धही वादग्रस्त विधान केले आहे. या प्रकरणाची प्रशासनाने दखल घेतली आहे. ETV bharat या व्हायरल व्हिडिओच्या अचूकतेची पुष्टी करत नाही.
हेही वाचा - कारवाईचा व्हिडिओ व्हायरल करणे पोलिसांच्या आले अंगलट, तीन पोलिस निलंबित