नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे संपूर्ण उत्तर भारतातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. यमुनेच्या पाण्याची पातळी वाढल्याने दिल्लीत पुराचा धोका निर्माण झाला आहे. यमुनेच्या पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. जुन्या दिल्ली रेल्वे पुलावर यमुनेच्या पाण्याची पातळी 207 मीटरच्या पुढे गेली आहे. मंगळवारी पहाटे 5 वाजेपर्यंत यमुनेच्या पाण्याची पातळी 207.08 मीटर नोंदवण्यात आली असून ही पूर पातळीची आतापर्यंतची सगळ्यात मोठी नोंद आहे. दिल्लीतील पुराचा वाढता धोका लक्षात घेता ओखला बॅरेजचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत.
-
#WATCH दिल्ली: यमुना नदी का जलस्तर खतरे के निशान से ऊपर बह रहा है, कई निचले इलाकों में घरों में यमुना का पानी घुसने के कारण लोग दिक्कतों का सामना कर रहे हैं।
— ANI_HindiNews (@AHindinews) July 12, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
वीडियो ओखला बैराज इलाके से है। pic.twitter.com/FLFHBnWFJr
">#WATCH दिल्ली: यमुना नदी का जलस्तर खतरे के निशान से ऊपर बह रहा है, कई निचले इलाकों में घरों में यमुना का पानी घुसने के कारण लोग दिक्कतों का सामना कर रहे हैं।
— ANI_HindiNews (@AHindinews) July 12, 2023
वीडियो ओखला बैराज इलाके से है। pic.twitter.com/FLFHBnWFJr#WATCH दिल्ली: यमुना नदी का जलस्तर खतरे के निशान से ऊपर बह रहा है, कई निचले इलाकों में घरों में यमुना का पानी घुसने के कारण लोग दिक्कतों का सामना कर रहे हैं।
— ANI_HindiNews (@AHindinews) July 12, 2023
वीडियो ओखला बैराज इलाके से है। pic.twitter.com/FLFHBnWFJr
हरियाणातील पुराचा दिल्लीला फटका : हरियाणात मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हरियाणातील हथिनी कुंडमधून नदीत पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदीच्या पाणी पातलीत वाढ झाली आहे. केंद्रीय जल आयोगाच्या फ्लड मॉनिटरिंग पोर्टलनुसार जुन्या रेल्वे पुलावरील पाण्याची पातळी सोमवारी संध्याकाळी 5 वाजता 205.4 मीटरहोती. मात्र ही पाणी पातळी मंगळवारी रात्री 8 वाजता 206.76 मीटरपर्यंत वाढली. सीडब्ल्यूसीने यमुनेच्या पाण्याची पातळी 207 मीटर वाढल्याबद्दल भीती व्यक्त केली असून प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तीन वेळा ओलांडली होती 207 मिटरची पातळी : यमुना नदीला आलेल्या पुरामुळे राजधानी दिल्लीत हाहाकार उडाला आहे. यमुना नदीची पाणी पातली सध्या 207.08 वर पोहोचली आहे. 1978 मध्ये दिल्लीतील अनेक भागाला पुराच्या पाण्याचा तडाखा बसला होता. हरियाणातून यमुना नदीत पाणी सोडण्यात आल्यामुळे त्यावेळी यमुनेची पातळी लोखंडी पुलावर 207.49 मीटरपर्यंत पोहोचली होती. पहिल्यांदाच यमुनेची पाणी पातळी इतकी वाढली होती. मात्र, त्यानंतर यमुनेच्या पाणी पातळीने सन 2010 मध्ये ते 207.11 मीटर आणि 2013 मध्ये 207.32 मीटरवर असा दोनदा 207 मीटरचा टप्पा ओलांडला होता. मात्र आता पुन्हा एकदा दिल्लीत मोठी पूरस्थिती परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे आणि हथिनीकुंड बॅरेजमधून पाणी सोडण्यात आल्यानंतर दिल्लीतील यमुना नदीला पूर आला आहे.
मंगळवारी 85 नागरिकांची सुटका : दिल्लीत यमुनेच्या पाणी पातळीत सतत वाढ होत आहे. त्यामुळे दिल्लीत उच्चस्तरीय बैठकही पार पडली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांनी परिस्थितीबाबत अनेक बैठका घेतल्या. याशिवाय यमुना नदीकिनाऱ्यावरील परिसरात पूरग्रस्तांसाठी छावण्याही उभारण्यात आल्या आहेत. मंगळवारी सायंकाळी बोट क्लबच्या टीमने पुरात अडकलेल्या 85 नागरिकांची सुटका केली होती. त्यांना मदत छावणीत हलवण्यात आले आहे.
हेही वाचा -
Assam Flood : आसाममध्ये पूरस्थिती गंभीर झाल्याने जनजीवन विस्कळीत, लाखो नागरिकांना पुराचा फटका
Assam Flood News: आसाममध्ये पुराचा कहर, 29 हजार लोक आणि 6 हजार जनावरांना फटका