ETV Bharat / bharat

Gujrat Riots : गुजरात दंगल: पोलिसांनी माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना केली अटक

author img

By

Published : Jul 13, 2022, 1:13 PM IST

गुजरात पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (SIT) माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना 2002 च्या जातीय दंगलीशी संबंधित एका प्रकरणात पालनपूर तुरुंगातून अटक केली ( Sanjiv Bhatt arrested in Gujarat riots case ) आहे.

Sanjiv Bhatt
संजीव भट्ट

अहमदाबाद ( गुजरात ) : गुजरात पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना 2002 च्या जातीय दंगलीशी संबंधित एका प्रकरणात पालनपूर तुरुंगातून अटक केली ( Sanjiv Bhatt arrested in Gujarat riots case ) आहे. दंगलीच्या संदर्भात निष्पाप लोकांना चुकीच्या पद्धतीने गोवण्याचा कट रचल्याच्या प्रकरणात 'ट्रान्सफर वॉरंट'द्वारे भट्ट यांना अटक करण्यात आली आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड आणि गुजरातचे माजी पोलीस महासंचालक आरबी श्रीकुमार यांच्यानंतर या प्रकरणात अटक करण्यात आलेला भट्ट हा तिसरा आरोपी आहे.

जन्मठेपेच्या शिक्षेत आहे तुरुंगात : ते 27 वर्ष जुन्या प्रकरणात 2018 पासून बनासकांठा जिल्ह्यातील पालनपूर तुरुंगात बंद होते. हे प्रकरण राजस्थानमधील एका वकिलाला चुकीच्या पद्धतीने अडकवण्याशी संबंधित आहे. खटल्यादरम्यान, माजी आयपीएस अधिकाऱ्याला जामनगरमधील कोठडीतील मृत्यू प्रकरणात जन्मठेपेची शिक्षाही सुनावण्यात आली होती. अहमदाबाद गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त चैतन्य मंडलिक यांनी नंतर सांगितले की आम्ही संजीव भट्ट यांना पालनपूर तुरुंगातून ट्रान्सफर वॉरंटवर ताब्यात घेतले आणि मंगळवारी संध्याकाळी औपचारिकपणे अटक केली.

दोघे जण आधीच तुरुंगात : गुजरात सरकारला 2002 गोध्रा ट्रेन आगीनंतरच्या दंगलींशी संबंधित विविध प्रकरणांमध्ये भट्ट, श्रीकुमार आणि सेटलवाड यांच्या खोट्या पुराव्यांवरील भूमिका तपासण्यासाठी SIT स्थापन करण्यात आली आहे. गुन्हे शाखेने गेल्या महिन्यात सेटलवाड आणि श्रीकुमार यांना अटक केली होती आणि ते अजूनही तुरुंगात आहेत.

हेही वाचा : गोध्रा दंगलीप्रकरणी मोदींसह भाजप नेत्यांना क्लीन चीट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.