नवी दिल्ली : भारताचे ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू आपल्या मागण्यांसाठी दिल्लीतील जंतरमंतरवर गेल्या चार दिवसांपासून निदर्शने करत आहेत. मात्र, दरम्यान, अशी काही छायाचित्रे समोर आली आहेत, ज्यावरून असे दिसून येते की, कुस्तीपटूंसाठी देश प्रथम येतो. जंतर-मंतरवर गेल्या ३ दिवसांपासून संपावर असलेल्या कुस्तीपटूंनी आज आपला नियमीत सराव होत नसल्याने येथे रस्त्यावर जाळे टाकून सराव करत सरवा केल्याचे पाहायला मिळाले. गेल्या चार दिवसांपासून हे आंदोलन करत आहेत. त्यांनी आपल्या मागण्या मांडल्या आहेत. त्या पुर्ण कराव्यात आणि आम्हाला न्याय द्यावा अशी विनंती त्यांनी कोर्टासह केली आहे. तसेच, जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
SC ने दिल्ली पोलीस आणि इतरांना नोटीस बजावली : दिल्लीच्या जंतरमंतरवर भारतीय कुस्तीपटूंचा संप अजूनही सुरू आहे. परंतु, त्यादरम्यान ते रस्त्यावर आपली रोजची कसरत करतानाही दिसले आहेत. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर लैंगिक छळाच्या आरोपावरून एफआयआर नोंदवण्याची मागणी करणाऱ्या सात महिला कुस्तीपटूंनी केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिल्ली पोलीस आणि इतरांना नोटीस बजावली आहे.
माजी मुख्यमंत्री भूपेंद्र हुड्डा, सीपीएम नेत्या वृंदा करात यांनी पाठिंबा दिला होता: आदल्या दिवशीच हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र हुड्डा, सीपीएम नेत्या वृंदा करात, काँग्रेस नेते उदित राज देखील कुस्तीपटूंना पाठिंबा देण्यासाठी पोहोचले होते. दरम्यान, गैरवर्तन करणाऱ्या पैलवानांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यावर सरकारकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नाहीत. पैलवानांच्या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. अजपर्यंत, त्यांनी उघड्यावर आपले आंदोलन चालूच ठेवले आहे. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही, असे पैलवानांचेही म्हणणे आहे.