नवी दिल्ली : भाजपचे खासदार असलेले भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लावलेल्या लैंगिक छळ आणि विनयभंगाच्या आरोपांबाबत जनमत जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षण अहवालानुसार, बहुसंख्य भारतीयांना असे वाटते की या आंदोलनांचा भाजपवर नकारात्मक परिणाम होईल. या सर्वेक्षणात एक प्रश्न विचारण्यात आला होता की, कुस्तीपटू आणि ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यातील वादामुळे भाजपचे निवडणुकीत नुकसान होईल, असे तुम्हाला वाटते का? त्याच्या प्रतिसादात, सुमारे 47 टक्के प्रतिसादकर्त्यांना असा विश्वास आहे की यामुळे खूप नुकसान होईल, तर 17.6 टक्के लोकांना वाटते की याचा काही प्रमाणात परिणाम होईल. त्यातच आज कुस्तीपटूंना पत्रकार परिषद घेऊन आपण आंदोलनात माघार घेतली नसल्याचेही स्पष्ट केले आहे.
-
"न हमने समझौता किया है, न हम पीछे हटेंगे। यह सब फर्जी है, हम इस विरोध को वापस नहीं लेंगे। हम एकजुट रहेंगे और न्याय के लिए विरोध करते रहेंगे। हमें कमजोर करने के लिए फर्जी खबरें फैलाई जा रही हैं... पूरा देश दिल्ली पुलिस के खिलाफ, ”सत्यव्रत कादियान, पहलवान और साक्षी मलिक के पति कहते…
— UmaShankar உமாசங்கர் (@YTLshankar) June 5, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">"न हमने समझौता किया है, न हम पीछे हटेंगे। यह सब फर्जी है, हम इस विरोध को वापस नहीं लेंगे। हम एकजुट रहेंगे और न्याय के लिए विरोध करते रहेंगे। हमें कमजोर करने के लिए फर्जी खबरें फैलाई जा रही हैं... पूरा देश दिल्ली पुलिस के खिलाफ, ”सत्यव्रत कादियान, पहलवान और साक्षी मलिक के पति कहते…
— UmaShankar உமாசங்கர் (@YTLshankar) June 5, 2023"न हमने समझौता किया है, न हम पीछे हटेंगे। यह सब फर्जी है, हम इस विरोध को वापस नहीं लेंगे। हम एकजुट रहेंगे और न्याय के लिए विरोध करते रहेंगे। हमें कमजोर करने के लिए फर्जी खबरें फैलाई जा रही हैं... पूरा देश दिल्ली पुलिस के खिलाफ, ”सत्यव्रत कादियान, पहलवान और साक्षी मलिक के पति कहते…
— UmaShankar உமாசங்கர் (@YTLshankar) June 5, 2023
भाजपला निवडणुकीत फटका बसेल - 23 टक्क्यांहून कमी लोकांचा असा विश्वास आहे की कुस्तीपटूंच्या निषेधाचा निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नाही. सुमारे 54 टक्के एनडीए समर्थकांना असे वाटते की भाजपला निवडणुकीत फटका बसेल. कुस्तीपटूंनी विरोधी पक्षांचा उघड पाठिंबा घेतल्याने एनडीए समर्थक खूश नाहीत. कुस्तीपटूंनी विरोधी पक्षांचा पाठिंबा घेणे चुकीचे असल्याचे सुमारे 51 टक्के लोकांचे मत आहे. विरोधी पक्षांचे सुमारे 54 टक्के समर्थक ते योग्य मानतात. या मुद्द्यावर मतदारांची विभागणी स्पष्टपणे दिसून येते. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या आधारे दिल्ली पोलिसांनी सिंह यांच्याविरोधात अनेक एफआयआर नोंदवले. दुसरीकडे कुस्तीपटू साक्षी मलिक रेल्वे कार्यालयात दाखल झाल्याने अनेक अफवा उठल्या होत्या.
-
#WATCH | Wrestler Sakshee Malikkh leaves from Railway Office, in Delhi. pic.twitter.com/jhAqdAUOGI
— ANI (@ANI) June 5, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | Wrestler Sakshee Malikkh leaves from Railway Office, in Delhi. pic.twitter.com/jhAqdAUOGI
— ANI (@ANI) June 5, 2023#WATCH | Wrestler Sakshee Malikkh leaves from Railway Office, in Delhi. pic.twitter.com/jhAqdAUOGI
— ANI (@ANI) June 5, 2023
लैंगिक गुन्ह्यांचा समावेश - यापैकी एक एफआयआर पॉक्सो कायद्यांतर्गत नोंदवण्यात आला आहे. यामध्ये अल्पवयीन मुलांवरील लैंगिक गुन्ह्यांचा समावेश आहे. उल्लेखनीय आहे की विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांसारख्या आशियाई, राष्ट्रकुल आणि ऑलिम्पिक पदक विजेत्या कुस्तीपटूंनी यावर्षी जानेवारीमध्ये ब्रिजभूषण सिंगवर गंभीर आरोप केले होते. या आरोपांच्या चौकशीसाठी क्रीडा मंत्रालयाने एक समिती स्थापन केली होती. आता सर्वोच्च न्यायालयही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. काही काळाच्या शांततेनंतर, एप्रिलपासून निदर्शने तीव्र झाली आहेत.
-
#WATCH | Wrestler Sakshee Malikkh arrives at her residence in Delhi. pic.twitter.com/vXUOTBw9IP
— ANI (@ANI) June 5, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | Wrestler Sakshee Malikkh arrives at her residence in Delhi. pic.twitter.com/vXUOTBw9IP
— ANI (@ANI) June 5, 2023#WATCH | Wrestler Sakshee Malikkh arrives at her residence in Delhi. pic.twitter.com/vXUOTBw9IP
— ANI (@ANI) June 5, 2023
तात्काळ अटकेची मागणी - आंदोलक कुस्तीपटू ब्रिजभूषण सिंग याच्या तात्काळ अटकेची मागणी करत आहेत. तर सिंग यांचा दावा आहे की, त्यांना खोट्या आरोपाखाली अडकवले जात आहे. एप्रिलमध्ये जंतरमंतरवर या प्रकरणात पोलिसांच्या निष्क्रियतेबद्दल कुस्तीपटूंनी धरणे आंदोलन सुरू केल्यापासून मोठ्या संख्येने विरोधी पक्ष आणि नागरी गटांनी कुस्तीपटूंना पाठिंबा दिला आहे.
हेही वाचा..
- Wrestlers Protest : साक्षी मलिकचे ट्विट - 'आंदोलन सुरूच राहणार, सर्व बातम्या खोट्या'
- Wrestlers in FIR : ब्रिजभूषणच्या कारनाम्याची लक्तरे वेशीवर, चुकीच्या पद्धतीने स्पर्ष, लैंगिक सुखाची मागणी, एफआयआरमध्ये माहिती
- Wrestlers Protest: कुस्तीपटुंनी अमित शाह यांची भेट घेऊनही तोडगा नाही, 9 जूनपर्यंत सरकारला दिला आहे अल्टीमेट