ETV Bharat / bharat

Worship in Shravan: श्रावणात 'या' पद्धतीने करा भगवान शंकराची आराधना; हमखास होईल शिवकृपा - शिवभक्त

व्रतवैकल्याचा आणि भगवंताच्या आराधनेचा महिना म्हणून श्रावण मासाचे हिंदू धर्मशास्त्रात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या महिन्यात केलेल्या भक्तीचे पुण्य अनंतपटीने मिळते अशी मान्यता आहे. श्रावण मासात सोमवारी मुख्यत: भगवान शंकरांच्या आराधनेला प्राधान्य दिले जाते. श्रावणात इच्छित फळप्राप्तीसाठी शंकराची भक्ती नित्यनेमाने केल्यास त्याचा लाभ होतो.

हमखास होईल शिवकृपा
हमखास होईल शिवकृपा
author img

By

Published : Jul 25, 2022, 5:36 PM IST

वाराणसी - उत्तर भारतीय पंचांगानुसार आषाढ मासाच्या मध्यम काळापासून श्रावण महिन्याची सुरुवात होते. तर महाराष्ट्रात श्रावण मासाची सुरुवात दीपअमावस्येपासून होते. यंदा मराठी पंचांगाप्रमाणे 28 जुलैपासून दीप अमावस्येनंतर मराठी भाषिकांचा श्रावण महिना सुरू होत आहे. तो 27 ऑगस्ट रोजी पिठोरी अमावस्येच्या दिवशी संपेल.

पूजेची विधी - श्रावण महिन्यात सकाळी ब्रह्ममुहुर्तावर उठून प्रात:स्नान करावे. यानंतर पांढरे वस्त्र किंवा सोहळे नेसून शिवलिंगाची पूजा करावी. सुरूवातीला उजव्या हातात तांब्याच्या लोट्यात शुद्ध जल, पांधरी फुले, गंध. पांढऱ्या अक्षता घेऊन प्रदोष व्रत करण्याचा संकल्प सोडावा. सोमवारी संपूर्ण दिवस उपवास करून सायंकाळी स्नान करावे. यानंतर पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून प्रदोषवेळी शंकराची पूजा करण्यास सुरुवात करावी. शिवलिंगाला शुद्ध पाण्याने आणि दह्या-दुधाने अभिषेक घालून त्यावर चंदनाचा लेप लावावा. यानंतर भगवान शंकरांना यज्ञोपवित, सुगंधित द्रव्य, बेलपत्र, कन्हेर, धोत्रा, मंदार, ऋतूफल, नैवेद्य आदी अर्पण करावे. शंकराचे आवाहन करताना धूप दीप नैवेद्य दाखवून इच्छित मनोकामना सांगावी. शिवभक्तांनी पूजा करताना कपाळावर भस्म किंवा चंदनाचा टिळा लावावा. श्रावण महिन्यात प्राचीन किंवा मोडकळीस आलेल्या शिवालयांचा जिर्णोद्धार करणाऱ्यांवर भगवान शंकर लवकर प्रसन्न होतात, अशी आख्यायिका आहे. शिवकृपा शिघ्र प्राप्त करण्यासाठी खालील पूजापद्धतीचाही अवलंब करता येईल.

शिवलिंगाचा अभिषेकः श्रावण महिन्यात देशातील सर्व मुख्य शिवालयात शंकराच्या पिंडीला पहाटे अभिषेक घातला जातो. शास्त्रात शिवलिंगाला स्नान घालण्याचे विविध प्रकार आहेत. उदा. दुग्धाभिषेक, शुद्ध जलाभिषेक, फळांच्या रसाने केला जाणारा अभिषेक, मधाभिषेक यासह अन्य अभिषेकाची प्रथा प्रचलित आहे. उत्तम आरोग्य आणि धनप्राप्तीसाठी भक्तांकडून शंकराच्या पिंडीला दुग्धाभिषेक आणि शुद्ध जलाभिषेक घातला जातो.

शिवमूठः श्रावण महिन्यात साधारणपणे 4 ते 5 श्रावण सोमवार येतात. प्रत्येक सोमवारी मुठीत वेगवेगळे धान्य घेऊन शंकराच्या पिंडीवर अर्पण केले जाते. यामध्ये जवस, तांदूळ, गहू, तीळ, पांढरे उडीद आदी धान्याचा समावेश असतो.

स्तोत्र, मंत्र पठणः श्रावण महिन्यात ओम नमः शिवाय हा प्रख्यात शिवमंत्र आहे. आरोग्यधनप्राप्ती, इच्छित मनोकामना पूर्ती, धनप्राप्तीच्या उद्देशाने या मंत्राची साधना केली जाते. अकाल मृत्युयोग निवारण, कालसर्प शांती, ग्रहशांतीसाठी श्रावणात महामृत्युंजय मंत्राचा जाप फलदायी ठरतो. यासह शिवतांडव स्तोत्र, शिवमहिन्म स्तोत्र, शिवनामावली, कालभैरव स्तोत्रांचेही पठन करता येईल.

हेहा पाहा - Video : 'लाखो शिवभक्तांमध्ये एक श्रावणकुमार', कावडमधून भोलेनाथांच्या दर्शनासाठी वृद्ध आईवडिलांना घेऊन जाणाऱ्या श्रावण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.