हैदराबाद : पृथ्वीवर असलेल्या प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे. मात्र काही विकृतांकडून पृथ्वीवरील दुर्मीळ वृक्ष, दुर्मीळ प्राणी, झाडांच्या प्रजातींची तस्करी करण्यात येते. याला आळा घालण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न करण्यात आले. संयुक्त राष्टाच्या महासभेने २०१३ ला यासाठी विश्व वन्यजीव दिवस ३ मार्चला घोषित केला. त्यानुसार ३ मार्चला दरवर्षी जागतिक वन्यजीव दिन साजरा करण्यात येतो. पृथ्वीवरील प्रत्येक वन्यजीवाला मानवासारखाच राहण्याचा आणि जगण्याचा अधिकार असल्याचे या दिवसातून पटवून देण्यात येते.
काय आहे यावर्षीची थीम : 3 मार्चला जागतिक वन्यजीव दिन साजरा करण्याची सुरुवात थायलंडपासून करण्यात आली. पृथ्वीवर असलेल्या जंगली जीवांना मुक्तपणे संचार करण्याचा आणि त्यांच्या हक्काबाबतची जागरुकता वाढवण्याबाबत या जागतिक वन्यदिनातून पटवून देण्यात आले. वन्य जीवांचे अनुवांशिक, वैज्ञानीक, सौंदर्यासहीत विविध बाबतींच्या अभ्यासाला चालना देण्याचे धोरणही यावेळी पटवून देण्यात आले. त्यामुळे थायलंडमधील बँकॉक येथे झालेल्या पहिल्या वन्यजीव दिनापासून ते आजपर्यंत जागतिक वन्यदिनाला संयुक्त महासभा विविध थीम घेऊन कार्य करते. यावर्षी जागतिक वन्यजीव दिनाची पार्टनरशीप फॉर वाईल्ड लाईफ कंझर्वेशन ( Partnerships for wildlife conservation ) ही थीम असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने घोषीत करण्यात आले आहे.
जागतिक वन्यजीव दिनाचा इतिहास : जागतिक पातळीवरील नागरिकांचे जीवन जल आणि जंगलावर अवलंबून आहे. मात्र तरीही अनेक जंगली प्राण्यांच्या आणि वन संपती तस्करी करण्याच्या घटना घडत होत्या. त्याला आळा घालण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने ३ मार्च १९७३ ला वन्यजीव आणि वनस्पतीच्या व्यापाराला रोखण्यासाठी करारावर ( CITES ) सही केली होती. त्यानंतर थायलंडमधील बँकॉक येथे संयुक्त राष्ट्र संघाचे अधिवेशन 20 डिसेंबर २०१३ ला आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात वन्यजीवांच्या तस्करीला रोखण्यासाठी आणि त्याबाबत जनजागृती करण्यासाठी ३ मार्च हा जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवण्यात आले. तेव्हापासून ३ मार्च हा जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
काय होत्या आतापर्यंतच्या थीम : पृथ्वीवर असलेल्या वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी विश्व वन्यजीव दिन साजरा करण्यात येतो. यासाठी दरवर्षी संयुक्त राष्ट्र संघाकडू एक थीम घेऊन त्यावर काम करण्यात येते. त्यासह नागरिकांमध्ये जनजागृतीही करण्यात येते. संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक वन्यजीव दिन घोषित केल्यापासून आतापर्यंत विविध थीम घेऊन काम करण्यात आले आहे. 2015 मध्ये वन्यजीवांच्या गुन्ह्यांविरोधात गंभीर होण्याची गरज असल्याची थीम घेऊन काम करण्यात आले. संयुक्त राष्ट्र संघाने 2016 मध्ये वन्यजीवांचे भविष्य आपल्या हातात असल्याची थीम घेऊन काम केले. 2017 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने युवकांनो आवाज ऐका अशी थीम घेऊन काम केले आहे. 2018 ला संयुक्त राष्ट्र संघाने मांजरांच्या प्रजातीतील वन्यजीव धोक्यात असल्याची थीम घेऊन त्यावर जनजागृती केली. 2019 ला नागरिक आणि ग्रहांसाठी पाण्याच्या खाली जीवन अशी थीम घेऊन संयुक्त राष्ट्राने जनजागृती केली. तर संयुक्त राष्ट्र संघाने 2020 ला पृथ्वीवर जीवन कायम ठेवणे ही थीम घेऊन काम केले. यावर्षी वन्यजीव संरक्षणासाठी योगदान अशी थीम घेऊन संयुक्त राष्ट्रसंघ जनजागृती करत आहे.
हेही वाचा - National Science Day 2023 : राष्ट्रीय विज्ञान दिन का साजरा केला जातो, जाणून घ्या सी व्ही रामन यांच्या संशोधनाविषयी!