हैदराबाद : जगात क्षयरोगाने मृत्यू होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण अचानक वाढले आहेत. जगात दरवर्षी 1.6 मिलियन नागरिकांचा क्षयरोगाने मृत्यू होतो. तर देशात क्षयरोगाने मृत्यू होणाऱ्या नागरिकांचे जगातील एकूण प्रमाणाच्या ३६ टक्के आहे. त्यामुळे क्षयरोगाने होणाऱ्या मृत्यूमुळे जागतिक पातळीवर चिंता पसरली आहे. भारतात क्षयरोग निर्मुलनासाठी विविध प्रकारच्या मोहीम राबवण्यात येतात. मात्र भारतातून क्षयरोग हद्दपार करण्यात अपयश आले आहे. उलट भारतात क्षयरोगाने होण्याऱ्या मृत्यूत वाढ झाली आहे.
का होतो क्षयरोग : क्षयरोगामुळे देशातील अनेक नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे भारतातून क्षयरोग हद्दपार करण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करण्यात येतात. क्षयरोग होण्याचे विविध कारणे असून एकदा क्षयरोग झाल्यास त्याचे समूळ उच्चाटन करणे कठीण होते. क्षयरोग हा मायक्रोबॅक्टेरिया या जिवाणूमुळे होतो, असा दावा शास्त्रज्ञांच्या वतीने करण्यात येतो. त्यातील खास करुन मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस या जिवाणूमुळे क्षयरोग होतो. क्षयरोगाचे जिवाणू फुफ्फुसांवर हल्ला करतात. त्यामुळे व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होऊन विविध आजारांचा सामना करावा लागतो
काय आहे इतिहास : क्षयरोग हा आजार अनेक भारतीयांमध्ये दिसून येतो. मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसीस या जिवाणूंमुळे क्षयरोग हा आजार होतो. क्षयरोग हा अत्यंत संसर्गजन्य आजार असल्याने त्याला वेळीच रोखणे गरजेचे आहे. क्षयरोग या आजाराच्या जीवाणूंचा डॉ रॉबर्ट कॉक यांनी पहिल्यांदा शोध लावला आहे. डॉ रॉबर्ट कॉक यांनी आपला शोधनिंबध २४ मार्चला जागतिक परिषदेत हा शोधनिबंध सादर करण्यात आला होता. त्यामुळे २४ मार्चला जागतिक पातळीवर क्षयरोग दिन साजरा करण्यात येतो.
काय आहेत लक्षणे : क्षयरोग हा संसर्गजन्य रोग असून त्याचे जिवाणू ३५ टक्के नागरिकांच्या शरीरात निद्रिस्त असल्याचा दावा शास्त्रज्ञांकडून केला जात आहे. मात्र माणसाची रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यानंतर क्षयरोगाचे जीवाणू प्रबळ होतात. त्यानंतर क्षयरोगाचे जिवाणू व्यक्तीच्या शरीरात संसर्ग करत असल्याचेही संशोधकांचे मत आहे. त्यामुळे क्षयरोग झालेल्या व्यक्तीला वारंवार डोकेदुखी, सतत दोन महिन्यापर्यंत खोकला येणे, मंद ताप येणे, वजन कमी होणे, छातीत दुखणे, रात्री घाम येणे आदी लक्षणे क्षयरोग झालेल्या व्यक्तीचे असतात. त्यामुळे क्षयरोग झालेल्या व्यक्तीची लक्षणे ओळखून काळजी घेणे कधीही चांगले आहे.
हेही वाचा - H3N२ : एच३ एन२ इन्फ्लूएंझामुळे घाबरुन जाऊ नका, अशी घ्या काळजी