ETV Bharat / bharat

World Population Day 2023 : जागतिक लोकसंख्या दिन 2023; जाणून घ्या हा दिन साजरा करण्याचे महत्त्व

अतिरिक्त लोकसंख्या आणि त्याचे परिणाम याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि जास्त लोकसंख्येमुळे आपल्याला भेडसावणाऱ्या समस्यांवर प्रकाश टाकण्यासाठी, संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने दरवर्षी 11 जुलै रोजी जगभरात जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यास सुरुवात केली.

World Population Day 2023
जागतिक लोकसंख्या दिन 2023
author img

By

Published : Jul 9, 2023, 10:34 AM IST

Updated : Jul 11, 2023, 6:32 AM IST

हैदराबाद : सन १९८९ मध्ये जगाची लोकसंख्या ५ अब्ज इतकी होती. जास्त लोकसंख्येमुळे उद्भवणाऱ्या समस्यांबद्दल चिंतित असलेल्या संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने जगभरात दरवर्षी 11 जुलै रोजी 'जागतिक लोकसंख्या दिन' साजरा करण्यास पुढाकार घेतला. हा दिवस अतिरिक्त लोकसंख्येच्या समस्येचे गांभीर्य आणि त्याचे जगावर होणारे परिणाम आणि समस्याग्रस्त परिणामांवर प्रकाश टाकतो.

लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी सकारात्मक पावले : जास्त लोकसंख्या ही निःसंशयपणे एक समस्या आहे. सन 2023 मध्ये जगाची लोकसंख्या 8 अब्ज एवढी असल्याची नोंद आहे. प्रत्येक राष्ट्राने आपल्या नागरिकांच्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी सकारात्मक पावले उचलली पाहिजेत. तसेच, नागरिकांनी आपापल्या सरकारांनी लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचे पालन करून सहकार्य करावे.

राष्ट्राच्या विकासात हातभार : अहवालानुसार भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. ज्याने लोकसंख्येच्या बाबतीत 1.4 अब्ज लोकसंख्येसह चीनला मागे टाकले आहे. भारत सरकारने लोकसंख्या नियंत्रणासाठी कुटुंब नियोजन आणि कल्याणकारी कार्यक्रमांसारखे अनेक उपक्रम घेतले आहेत. परंतु, वाढलेल्या लोकसंख्येचा प्रभावीपणे वापर केल्यास काही सकारात्मक बाबी असू शकतात.

जागतिक लोकसंख्या दिन थीम : वर्ष 2023 मध्ये जागतिक लोकसंख्या दिन आपल्या जगाच्या अनंत शक्यतांना अनलॉक करण्यासाठी महिला आणि मुलींचा आवाज उठवणे" या थीमभोवती साजरा केला जात आहे. ही थीम महिलांसाठी समान हक्कांचे महत्त्व अधोरेखित करते. यातून महिलांच्या गरजा लक्षात घेणे किती महत्त्वाचे आहे. हा दिवस महिलांना त्यांच्या पूर्ण क्षमतेची जाणीव करून देण्यासाठी आणि त्यांना सक्षम करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करू शकणार आहे.

हेही वाचा :

  1. World Zoonoses Day 2023 : जागतिक झूनोसेस दिवस 2023; जाणून घ्या झूनोसेसचे महत्त्व आणि इतिहास
  2. World Chocolate Day 2023 : वर्ल्ड चॉकलेट डे 2023; दरवर्षी का साजरा केला जातो वर्ल्ड चॉकलेट डे, जाणून घ्या रंजक गोष्ट...
  3. International Kissing Day 2023 : आंतरराष्ट्रीय चुंबन दिन 2023; जाणून घ्या शरीर निरोगी ठेवण्यात काय आहे चुंबनाची भूमिका...

Last Updated : Jul 11, 2023, 6:32 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.