आयोडीन आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे, हे बहुतेक लोकांना माहित आहे. परंतु शरीरात आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणत्या प्रमाणात आणि कोणते आजार आणि समस्या उद्भवू शकतात, याबद्दल बहुतेक लोकांना माहिती नसते. दरवर्षी आयोडीनच्या कमतरतेमुळे जगभरातील मोठ्या संख्येने लोक, विशेषत: लहान मुले, अनेक रोग आणि विकारांना बळी पडतात. आयोडीनची कमतरता आपल्या आरोग्यासाठी आणि शारीरिक विकासासाठी किती महत्त्वाची आहे आणि त्याची कमतरता आरोग्यावर कसा परिणाम करू शकते याची जाणीव करून देण्यासाठी जगभरात २१ ऑक्टोबर रोजी 'जागतिक आयोडीनची कमतरता प्रतिबंधक दिन' (WORLD IODINE DEFICIENCY PREVENTION DAY) साजरा केला जातो.World iodine deficiency disorders prevention day . Iodine deficiency disease . Iodine salt . Iodine containing food . Iodine food .Good Health.
जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, सध्या जगातील सुमारे एक तृतीयांश लोकसंख्येला आयोडीनच्या कमतरतेमुळे होणा-या रोगांच्या जोखमीने वेढले आहे. आयोडीनचे आरोग्यासाठी होणारे फायदे आणि त्याच्या कमतरतेमुळे होणाऱ्या आजारांबाबत जगभरात अनेक प्रकारच्या जनजागृती मोहिमा राबवल्या जात असल्या, तरी जगभरातील सुमारे ५४ देशांमध्ये आयोडीनची कमतरता अजूनही आहे. आयोडीनच्या कमतरतेमुळे होणाऱ्या आजारांबद्दल जगभरातील लोकांना जागरूक करण्यासाठी आणि प्रत्येक घरात आयोडीनयुक्त मिठाची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी जागतिक आयोडीन कमतरता प्रतिबंधक दिन किंवा जागतिक आयोडीन विकास दिवस दरवर्षी 21 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो.
आयोडीनचे महत्त्व : आयोडीन हे खरेतर एक सूक्ष्म पोषक घटक आहे. जे आपल्या शरीराच्या विकासासाठी आणि शरीराच्या अनेक प्रणाली आणि कार्ये सुरळीत चालण्यासाठी आवश्यक आहे. हे केवळ शारीरिकच नव्हे, तर त्यांच्या मानसिक विकासासाठी देखील खूप महत्वाचे आहे. आपल्याला मिठापासून आयोडीन मिळते, परंतु येथे हे जाणून घेणे देखील खूप महत्वाचे आहे की, केवळ आयोडीनची कमतरता नाही तर आयोडीनचे अति प्रमाणात सेवन करणे देखील शरीरासाठी हानिकारक आहे. म्हणूनच डॉक्टर नेहमी संतुलित प्रमाणात मीठ वापरण्याची शिफारस करतात.
महिलांमध्ये आयोडीनची कमतरता : योग्य आणि संतुलित प्रमाणात आयोडीन घेणे विशेषतः गर्भवती महिला आणि मुलांसाठी खूप महत्वाचे मानले जाते. बालवयात मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी सर्व प्रकारच्या पोषणासोबत आयोडीन हे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे शरीराची विकास प्रक्रिया सुरळीत राहतेच, पण मुलांच्या मानसिक व बौद्धिक विकासासाठीही हे खूप महत्त्वाचे असते. शरीरातील थायरॉईड प्रक्रियेसाठी आयोडीन देखील आवश्यक घटक मानले जाते. गरोदर महिलांच्या शरीरात आयोडीनची कमतरता असल्यास, तिच्या गर्भातील बाळाच्या विकासात समस्या उद्भवू शकतात. स्त्रियांमध्ये आयोडीनच्या कमतरतेमुळे कधीकधी गर्भपात, मृत जन्म आणि मुलांमध्ये मतिमंदवणा देखील होऊ शकतो. आकडेवारीनुसार, आयोडीनची कमतरता 100 पैकी 6 गर्भपातासाठी जबाबदार आहे. शरीरात आयोडीनच्या कमतरतेमुळे केवळ विकासच नाही, तर इतर अनेक प्रकारचे विकार किंवा रोग देखील होऊ शकतात.
आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारे आजार : गलगंड रोग होणे, थायरॉईड ग्रंथी वाढणे किंवा (Thyroid gland or hypothyroidism) हायपोथायरॉईडीझम, मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास थांबणे, मज्जातंतू आणि स्नायू कडक होणे, मानसिक अपंगत्व, बहिरेपणा आणि मतिमंदपणा येणे, तसेच नखे, त्वचा आणि केसांच्या समस्या उध्दभवणे.
विविध संस्थांचे प्रयत्न : आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारे आजार आणि समस्यांबाबत सर्वसामान्यांना जागरूक करण्याच्या उद्देशाने 1980 पासून जागतिक आरोग्य संघटना 'नॅशनल सॉल्ट आयोडायझेशन प्रोग्राम' अंतर्गत विविध कार्यक्रम राबवत आहे. तसेच युनिसेफ आणि 'इंटरनॅशनल कौन्सिल फॉर कंट्रोल ऑफ आयोडीन डेफिशियन्सी डिसऑर्डर्स' संयुक्तपणे आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक जनजागृती कार्यक्रमही राबवतात. आकडेवारी दर्शवते की, या मोहिमेमुळे आतापर्यंत सुमारे 66% घरांमध्ये आयोडीनयुक्त मीठाची उपलब्धता सुनिश्चित करण्यात आली आहे.
सरकारच्या विविध योजना : आयोडीनच्या कमतरतेबाबत अनेक वर्षांपासून भारत सरकारकडून अनेक मोहिमा राबवल्या जात आहेत. सर्वप्रथम या समस्येची गुंतागुंत लक्षात घेऊन भारत सरकारने 1962 मध्ये 'राष्ट्रीय गलगंड रोग नियंत्रण कार्यक्रम' सुरू केला. ज्याचे नाव 1992 मध्ये 'नॅशनल आयोडीन डेफिशियन्सी डिसऑर्डर कंट्रोल प्रोग्राम' असे बदलले गेले. या कार्यक्रमांतर्गत, जनतेला आयोडीनयुक्त मीठ उपलब्ध करून देणे, आयोडीनच्या कमतरतेमुळे होणाऱ्या आजारांवर सर्वेक्षण व संशोधन करणे, प्रयोगशाळांमध्ये आयोडीनयुक्त मिठाचे निरीक्षण करणे आणि संबंधित आरोग्य, शिक्षण आणि जनजागृती आणि प्रचार यावर भर देण्यात आला आहे. याशिवाय, प्रत्येक घरात आयोडीनयुक्त मिठाचा वापर सुनिश्चित करण्यासाठी, भारत सरकारने अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा 1954 अंतर्गत मे 2006 पासून बिगर आयोडीनयुक्त मिठाच्या विक्रीवर बंदी घालणारी अधिसूचना जारी केली होती. Good Health.