ETV Bharat / bharat

World Consumer Protection Day 2023 : मुंबईतून झाली ग्राहक चळवळ सुरू तर पुण्यात पंचायतीची स्थापना; जाणून घ्या ग्राहक संरक्षण दिनाचा इतिहास

ग्राहकांच्या संरक्षणासह त्यांचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी ग्राहक संरक्षण दिन साजरा कऱण्यात येतो. ग्राहक संरक्षणाची चळवळ १९६६ च्या दरम्यान मायानगरी मुंबईतून सुरू झाली होती.

World Consumer Protection Day 2023
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Mar 14, 2023, 12:57 PM IST

Updated : Mar 15, 2023, 8:29 AM IST

हैदराबाद : सध्या बाजारात अनेक प्रकारच्या वस्तू ऑनलाईन पद्धतीने खरेदी करण्यात येतात. मात्र या वस्तू दर्जेदार असतातच असे नाही. त्यासह बाजारात मिळणाऱ्या सगळ्यात वस्तू दर्जेदार नसतात. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता जास्त असते. ग्राहकांना फसवणाऱ्या व्यापाऱ्यांकडून ग्राहकांना संरक्षण देणे आणि त्यांचे हक्क अबाधित ठेवणे गरजेचे ठरते. त्यासाठी १५ मार्चला ग्राहक संरक्षण दिन साजरा करण्यात येतो. मात्र ग्राहक चळवळीची सुरूवात मुंबईत १९६६ च्या दरम्यान झाली असून पहिली ग्राहक पंचायत पुण्यात स्थापन झाल्याचा दावा करण्यात येतो.

साठेबाजी, काळेबाजाराला आळा घालणे : ग्राहक व्यापाऱ्यांवर विश्वास ठेऊन बाजारातून वस्तू विकत घेतात. मात्र अनेकदा ग्राहकांची फसवणूक होते. त्यामुळे ग्राहकांचे प्रचंड नुकसान होते. कधी कधी व्यापारी नफा कमवण्यासाठी सर्रास साठेबाजी, काळाबाजार, भेसळयुक्त साहित्याचे बाजारात वितरण, जादा दर आकारणे, अप्रमाणित वस्तूंची विक्री करतात. त्यामुळे ग्रहाकांच्या फसवणुकीविषयी जनजागृती मोहीम राबवण्याची गरज असते. या दिवशी मोजमापातील अनियमितता, हमीनंतर सेवा न देणे याशिवाय ग्राहकांविरुद्ध केलेले गुन्हे लक्षात घेऊन ग्राहक संरक्षण दिन साजरा करण्यात येतो.

मुंबईत सुरू झाली ग्राहक चळवळ : आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची जगभरात ओळख आहे. मात्र या मायानगरीत अनेकदा ग्राहकांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळेच 1966 मध्ये मुंबईतून ग्राहक चळवळ सुरू झाली. ती पुढे भारतभर पसरली. सन 1974 मध्ये पुण्यात ग्राहक पंचायतीची स्थापना झाल्यानंतर अनेक राज्यांमध्ये ग्राहक कल्याणासाठी संघटना स्थापन झाल्या. त्यानंतर ही चळवळ वाढत जाऊन ग्राहक संरक्षणासाठी ग्राहक संरक्षण दिन सुरू झाला.

ग्राहकाच्या संरक्षणाचा अधिकार : प्रत्येक ग्राहकाला धोकादायक वस्तू आणि सेवांच्या वितरनापासून संरक्षण मिळण्याचा अधिकार आहे. सर्व नागरिकांचे सुरक्षित जीवन सुनिश्चित करण्यासाठी हा अधिकार देण्यात आला आहे. या अधिकारामध्ये ग्राहकांच्या दीर्घकालीन हितसंबंधांची तसेच त्यांच्या सध्याच्या गरजा यांचा समावेश आहे. त्यामुळे ग्राहकांची कोणी फसवणूक केली, तर त्यांना ग्राहक संरक्षण मंचात तक्रार दाखल करता येते.

जाणून घेण्याचा अधिकार : ग्राहकांना वस्तू किंवा सेवांची गुणवत्ता, प्रमाण, शुद्धता, मानक आणि किंमत याबद्दल योग्य माहिती मिळाली पाहिजे. यामुळे ग्राहक अनेक चुकीच्या गोष्टींपासून स्वतःचे रक्षण करू शकतो. अशा प्रकारे सर्व संबंधित माहिती पुरवण्याची जबाबदारी वस्तूंच्या उत्पादकाची आहे. त्यामुळे ग्राहक एखाद्या वस्तूची खरेदी करताना त्याबाबतची सगळी माहिती उत्पादकाकडे मागू शकतो.

हेही वाचा - World Pi Day 2023 : आज जागतिक π दिवस, जाणून घ्या, गणिताशी संबंधित काही रंजक गोष्टी

Last Updated : Mar 15, 2023, 8:29 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.