हैदराबाद World Anti Obesity Day 2023 : लठ्ठपणा आणि जास्त वजन ही समस्या केवळ उच्चभ्रू किंवा पाश्चात्य देशांतील लोकांची समस्या मानली जात होती. आता हे गृहीतक पूर्णपणे चुकीचं सिद्ध झालंय. लठ्ठपणाची समस्या केवळ भारतातच नाही तर जागतिक स्तरावर गंभीर बनली आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणात लोकसंख्या मधुमेह, हृदयविकार, पक्षाघात यांसारख्या आजारांनी ग्रस्त आहे. दरम्यान, या आजारांमुळं मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू होत असून यामध्ये महिलांचं प्रमाण अधिक आहे.
जागतिक स्तरावर लठ्ठपणाचे असे आहे प्रमाण :
- राजीव अहिरवार आणि प्रकाश रंजन मंडळ यांनी नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनवर प्रकाशित केलेल्या संशोधनानुसार, जगभरातील 1.9 अब्जाहून अधिक लोकांचे वजन जास्त आहे.
- जगातील 65 कोटींहून अधिक लोक लठ्ठपणाने त्रस्त आहे. भारतात त्याचा आकडा 13.5 कोटी इतका आहे.
- जगभरात 28 लाखांहून अधिक लोक दरवर्षी लठ्ठपणा आणि जास्त वजनामुळे आपला जीव गमावतात.
- डॉक्टरांच्या मते, चरबीयुक्त अन्न, नियमित शारीरिक हालचालींचा अभाव, आरोग्याबाबत जागरूकता नसणे ही लठ्ठपणा आणि जास्त वजनाची कारणं मानली जातात.
- लठ्ठपणाचं प्रमाण पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त आहे.
- आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, लठ्ठपणा आणि त्याचे दुष्परिणाम याविषयी जनजागृती करून या समस्येचा प्रसार रोखला जाऊ शकतो.
- लठ्ठपणा टाळण्यासाठी आरोग्यदायी जीवनशैलीचे फायदे, आहाराच्या चांगल्या सवयी इत्यादींबाबत सरकारनं लोकांमध्ये जनजागृती मोहीम राबवावी.
भारतात लठ्ठपणाची समस्या : भारत सरकारच्या वतीनं नियोजित वेळेत सामान्य लोकांच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, आरोग्य आणि विकासाच्या इतर मापदंडांवर अभ्यास केला जातो. राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण-5 मार्च 2022 मध्ये असाच एक संशोधन अभ्यास प्रसिद्ध झाला. यापूर्वी राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-4 प्रसिद्ध करण्यात आले होते. एनएफएचएस-5 मध्ये एनएफएचएस-4 सह तुलनात्मक अभ्यास देखील केला गेलाय.
- एनएफएचएस-5 च्या अहवालानुसार, भारतातील बहुतांश राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील नागरिकांमध्ये जास्त वजन किंवा लठ्ठपणाची समस्या गंभीर असल्याचं निदर्शनास आलंय.
- राष्ट्रीय स्तरावर महिलांमधील लठ्ठपणाची समस्या 21 टक्क्यांवरून 24 टक्क्यांपर्यंत वाढली आहे.
- पुरुषांमधील लठ्ठपणाची समस्या 19 टक्क्यांवरून 23 टक्क्यांपर्यंत वाढली आहे.
- केरळ, अंदमान आणि निकोबार बेट, लक्षद्वीप, गोवा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, सिक्कीम, मणिपूर, दिल्ली, पुडुचेरी आणि चंदीगडमध्ये एक तृतीयांश पेक्षा जास्त महिला (34-46 टक्के) लठ्ठ आहेत.
- सडपातळ पुरुषांचे प्रमाण शहरी भागापेक्षा (13 टक्के) ग्रामीण भागात (18 टक्के) जास्त आहे, तर ग्रामीण भागात 19 टक्के पुरुषांच्या तुलनेत शहरी भागात 30 टक्के पुरुष लठ्ठ आहेत.
- जर आपण पातळ पुरुषांच्या प्रमाणाबद्दल बोललो तर ते बिहारमध्ये सर्वाधिक (22 टक्के) आहे.
- अंदमान आणि निकोबार बेटांवर (45 टक्के) जास्त वजन असलेल्या किंवा लठ्ठ पुरुषांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ पाँडिचेरी (43 टक्के) आणि लक्षद्वीप (41 टक्के) यांचा क्रमांक लागतो.
हेही वाचा -