क्राइस्टचर्च: आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक ( ICC Women's ODI World Cup ) स्पर्धेतील गुरुवारी 24 वा सामना खेळला गेला. हा सामना पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड संघात पार पडला. या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानला 9 विकेट्सने पराभूत केले आहे. क्राइस्टचर्चमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना 41.3 षटकांत अवघ्या 105 धावांत गारद झालाप्रत्युत्तरात इंग्लंडने 19.2 षटकांत एक विकेट गमावून लक्ष्य गाठले. इंग्लंडची सलामीवीर डॅनिएल व्याटला नाबाद 68 धावांच्या खेळीसाठी सामनावीराचा पुरस्कार ( Player of The Match Danielle Wyatt ) देण्यात आला.
-
A huge win for England as they beat Pakistan by nine wickets and boost their net run-rate 🔥#CWC22 pic.twitter.com/Mgpk5qcDMI
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) March 24, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">A huge win for England as they beat Pakistan by nine wickets and boost their net run-rate 🔥#CWC22 pic.twitter.com/Mgpk5qcDMI
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) March 24, 2022A huge win for England as they beat Pakistan by nine wickets and boost their net run-rate 🔥#CWC22 pic.twitter.com/Mgpk5qcDMI
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) March 24, 2022
इंग्लंडची कर्णधार हीदर नाइटने ( England captain Heather Knight ) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या पाकिस्तानची सलामीवीर नाहिदा खानला पहिल्याच चेंडूवर बाद झाली. तिला गोलंदाज कॅथरीन ब्रंटने बाद करत पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. कर्णधार बिस्माह मारूफही नऊ धावांवर बाद झाली. तसेच पाकिस्तानचा निम्मा संघ 58 धावांवर बाद झाला. अमीनने 31 आणि सिद्रा नवाजने 23 धावा करत संघाला 100 धावांच्या पुढे नेले. इंग्लंडच्या कॅथरीन ब्रंट आणि एक्लेस्टोनने 3-3 बळी घेतले. केट क्रॉस आणि हेदर नाइटनेही 1-1 विकेट घेतली.
इंग्लंडच्या संघाला विजयसाठी 106 धावांच्या लक्ष्य मिळाले होते. या लक्ष्यााच पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात देखील खराब झाली. टॅमी ब्युमॉन्टला डायना बेगने दोन धावांवर बाद केले. मात्र त्यानंतर डॅनिएल व्याटने शानदार फलंदाजी करताना पाकिस्तानी गोलंदाजांना एकही संधी दिली नाही. व्याटने आपल्या या खेळीत अवघ्या 68 चेंडूत 76 धावा केल्या. त्याचबरोबर हीदर नाइटने देखील तिला उत्तम साथ दिली. हीदर नाइटने 24 धावांची खेळी केली. तसेच या दोन्ही फलंदाजांमध्ये दुसऱ्या विकेट्साठी नाबाद शतकी भागीदारी झाली. ज्याच्या जोरावर इंग्लंड संघाने 9 विकेट्स राखून विजय नोंदवला.
संक्षिप्त धावफलक:
इंग्लंड: 107/1 (डॅनी व्याट नाबाद 76, हीदर नाइट नाबाद 24; डायना बेग 1/14).
पाकिस्तान: 105/10 (सिद्रा अमीन 32, सिद्रा नवाज 23; कॅथरीन ब्रंट 3/17, सोफी एक्लेस्टोन 3/18).
हेही वाचा - Women World Cup 2022: दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज पावसामुळे रद्द; दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत दाखल