नवी दिल्ली : दिल्लीतील इंद्रपुरी भागात एका ११ वर्षाच्या मुलाच्या हत्येचा खुलासा पोलिसांनी केला आहे. मुलाच्या वडिलांसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या पूजा नावाच्या मुलीला पोलिसांनी हत्येप्रकरणी अटक केली. पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर पूजाच्या लिव्ह-इन पार्टनरने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिल्याचा आरोप आहे. याचा बदला घेण्यासाठी पूजाने तिच्या प्रियकराच्या मुलाची हत्या केली. पोलिसांच्या चौकशीत आरोपी तरुणीने आपला गुन्हा मान्य केला आहे. बालकाचा गळा दाबल्यानंतर आरोपी पूजाने तिच्या प्रियकराला कॉल करून सांगितले होते की - मी तुझी सर्वात मौल्यवान वस्तू हिसकावून घेतली आहे. (women killed boyfriend son)
मुलाच्या वडिलांसोबत लिव्ह-इनमध्ये राहत होती : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ वर्षीय आरोपी पूजा कुमारीचे जितेंद्र नावाच्या व्यक्तीसोबत संबंध होते. जितेंद्र आधीच विवाहित होता आणि त्याला एक मुलगा होता. त्याने पूजाला सांगितले की तो त्याच्या पत्नीला घटस्फोट देईल आणि नंतर पूजाशी कोर्टात लग्न करेल. यानंतर दोघेही भाड्याच्या फ्लॅटमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. या दरम्यान घटस्फोटावरून दोघांमध्ये भांडणे सुरू झाली. दरम्यान, जितेंद्रने पत्नीला घटस्फोट देण्यास नकार दिला. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये जितेंद्रने पूजाला सोडले आणि पत्नीसोबत राहू लागला. याचा पूजाला खूप राग आला. तिला याचा बदला घ्यायचा होता.
मुलाचा झोपेत असताना गळा आवळून खून : १० ऑगस्ट रोजी पूजाला एका कॉमन फ्रेंडमार्फत जितेंद्रच्या घराचा पत्ता मिळाला. ती तिथे पोहोचली तेव्हा घराचा दरवाजा उघडा होता. आत कोणीच नव्हते. घरात फक्त हा ११ वर्षाचा मुलगा झोपला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पूजाने मुलगा झोपेत असताना त्याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर ती त्याचा मृतदेह बेडमध्ये लपवून पळून गेली.
सीसीटीव्हीद्वारे शोध लावला : गुरुवारी (१० ऑगस्ट) रात्री साडेआठ वाजता पोलिसांना बीएलके हॉस्पिटलमध्ये एक बालक मृतावस्थेत आणल्याची माहिती मिळाली. त्याच्या मानेवर गळा दाबल्याच्या खुणा होत्या. पोलिसांनी मुलाच्या घराच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता घरात सर्वात शेवटी पूजा गेल्याचे दिसले. या प्रकरणी पोलिसांनी ३०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पूजाला अटक केली. पूजाविरुद्ध इंदरपुरी पोलिस ठाण्यात कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. खुनाच्या पाच दिवसानंतर मंगळवारी तिला अटक करण्यात आली.
हेही वाचा :