हैदराबाद - खून प्रकरणाचा आरोप असलेल्या महिलेला नग्न करून काठीने मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार तेलंगाणामध्ये समोर आला आहे. मृत व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांनी महिलेला मारहाण करत असताना संपूर्ण गावाने बघ्याची भूमिका घेतली. महिलेवरील अत्याचाराची घटना सुर्यापेट जिल्ह्यातील राजुनाईक थंडा येथे रविवारी घडली आहे.
सूर्यपेट मंडलातील राजूनायकतांडा येथील रहिवाशी शंकर नायक याची 13 जूनला हत्या झाली. शंकर नायक याच्याशी अनैतिक संबंध असल्याचा संशय असल्यावरून पोलिसांनी महिलेला अटक केली होती. ही महिला शंकर नायक याची नातेवाईक आहे. नुकतेच संशयित आरोपी महिलेची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. ती बहिणीबरोबर सुर्यापेट येथे राहत आहे.
हेही वाचा-तालिबान विरोधात दंड थोपटणाऱ्या अमरुल्लाह सालेह यांची मुलगी भारतात घेतेय शिक्षण
पळून गेल्याने वाचला जीव
महिला ही राजूनायकतांडा येथे गेली असता तिचा मृताच्या नातेवाईकांबरोबर वाद झाला. संतप्त नातेवाईकांनी तिला घरात कोंडले. तिच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली. पीडितेची कपडे फाडून तिला मारहाण करण्यात आली. तिच्यावर अत्याचार होत असताना कोणीही पुढे आले नाही. अखेर कसाबसा जीव वाचविण्यासाठी पीडिता ही मंडल परिषद मतदारसंघात पळून गेली. तिथे शांताबाई यांनी पीडितेला कपडे दिले. पोलीस येईपर्यंत पीडितेला घरात सुरक्षित ठेवले. पीडितेला सुर्यापेट सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
हेही वाचा-'घटनेतील कलम 15 आणि 25 ही विकून टाकले का'; 'जय श्री राम' घोषणेवरून राहुल गांधींचा केंद्राला सवाल
महिलेला वाचविण्यासाठी कोणीही पुढे आले नाही-
पीडितेने लुनावत भारती, बानोटु ज्योती, लुनावत पद्मा, ज्योती, सुनिता, पिंपली, राजेश, सुप्रिया, किशन आणि एका मुलीविरोधात अत्याचार केल्याची पोलिसात तक्रार दिली आहे. प्रत्यक्ष घटनेचा साक्षीदार असलेल्या संरपंचांनी महिलेला वाचविण्यासाठी कुणीही पुढे आले नसल्याचे सांगितले आहे. या प्रकरणात सुर्यापेठ ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षण लवकुमार हे पुढील तपास करीत आहेत.