हैदराबाद - धावत्या रेल्वेतून उतरणे जीवासाठी धोकादायक ठरू शकते, हे माहित असूनही अनेकदा प्रवासी जोखीम घेतात. असाच प्रकार चित्तुर जिल्ह्यातील तिरुपती येथील रेल्वे स्टेशनवर घडली आहे. यावेळी देवदुतासारख्या धावलेल्या रेल्वे पोलीस कॉन्स्टेबलने महिलेचे प्राण मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले आहेत. ही घटना पहाटे साडेचार वाजता घडली आहे.
महिला धावत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हा ती तोल न सावरल्यामुळे रेल्वेखाली जात होती. हा प्रसंग पाहताना रेल्वे कॉन्स्टेबल सतिश यांनी प्रसंगावधान दाखविले. महिला रेल्वेखाली जात असताना तिला खेचून प्लॅटफॉर्मवर सुरक्षितपणे आणले.
हेही वाचा-ख्रिश्चन धर्मगुरुंकडून नियमांचे उल्लंघन करत प्रार्थना; 100 जणांना कोरोना, दोघांचा मृत्यू
रेल्वे अधिकाऱ्यांकडून पोलीस कॉन्स्टेबलचे कौतुक-
महिलेचे प्राण वाचवित असतानाचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. महिला आणि तिच्या कुटुंबियांचे रेल्वे पोलिसांनी सुरक्षित प्रवासाबाबत समुपदेशन केले आहे. घाईत असताना रेल्वेमधून उतरण्याचा प्रयत्न केल्याचे महिलेने सांगितले आहे. महिला प्रवाशाचे प्राण वाचविल्याबद्दल रेल्वे पोलीस कॉन्स्टेबल सतीश यांचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक करण्यात येत आहे. महिला प्रवासी कुटुंबासमवेत तिरुमला एक्सप्रेसने तिरुमला स्टेशनवर पोहोचली होती.
हेही वाचा-अधिकाऱ्यांना तुरुंगात ठेवल्याने दिल्लीत ऑक्सिजन येऊ शकत नाही- सर्वोच्च न्यायालय