ETV Bharat / bharat

Delhi Gangraped : घृणास्पद, बलात्कारानंतर मुंडन करून तोंडाला काळे फासले अन् चप्पलांचा हार घालून मिरवणूक काढली - दिल्ली क्राईम न्यूज

शाहदरा येथे परस्पर वैमनस्यातून एका तरुणीचे अपहरण करून चार जणांनी तिच्यावर बलात्कार ( Delhi Rape Case ) केल्याची घटना घडली आहे. तर आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी बलात्कारानंतर तरुणीचे मुंडन करून तोंडाला काळे फासले आणि चप्पलचा हार घालून वस्तीत फिरवले. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केले आहे.

दिल्ली सामूहिक बलात्कार
Delhi Gangraped
author img

By

Published : Jan 27, 2022, 5:47 PM IST

नवी दिल्ली - दिल्लीतील शाहदरा जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी घृणास्पद घटना घडली आहे. शाहदरा येथे परस्पर वैमनस्यातून एका तरुणीचे अपहरण करून चार जणांनी तिच्यावर बलात्कार ( Delhi Rape Case ) केल्याची घटना घडली आहे. तर आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी बलात्कारानंतर तरुणीचे मुंडन करून तोंडाला काळे फासले आणि चप्पलचा हार घालून वस्तीत फिरवले. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केले असून त्यांची चौकशी सुरू आहे.

बलात्कारानंतर तरुणीचे मुंडन करून तोंडाला काळे फासले

पोलिसांकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, पीडित तरुणी (20) शाहदरा येथील कस्तुरबा नगर भागातील रहिवासी आहे. काही वर्षांपूर्वी तिची 12-13 वर्षांच्या एका मुलाशी मैत्री झाली होती. हळुहळु त्यांची मैत्री वाढत गेली आणि घरच्यांना याची माहिती झाली. पीडित मुलगी 16 वर्षांची असताना तिच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न दुसरीकडे लावले. मात्र, त्यानंतरही दोघांची भेट सुरूच होती. आता पीडितेला एक मूलही आहे.

पोलिसांनी चार आरोपींना अटक केले आहे.

काही दिवसांपूर्वी पीडित तरुणीने संबंधित मुलाला भेटण्यास नकार दिला आणि आपण येथून पुढे कधीच भेटायचे नाही, असे सांगितले. यावर संबंधित मुलाने (16) रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. त्याचा मृत्यू झाल्यापासून मुलाचे कुटुंबीय मुलाच्या मृत्यूसाठी पीडितेला जबाबदार धरत होते. तेव्हापासून कुटुंबीय पीडितेचा वेगवेगळ्या प्रकारे छळ करत होते. पीडितनेच मुलाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले होते. त्यामुळेच तरुणाने आत्महत्या केल्याचा आरोप मृत तरुणाच्या नातेवाईकांनी केला आहे.

महिला आयोगाची दिल्ली पोलिसांना नोटीस -

ही बाब दिल्ली महिला आयोगाच्या निदर्शनास आल्यानंतर स्वाती मालीवाल यांनी पीडित मुलीची भेट घेतली. याप्रकरणी महिला आयोगाच्या वतीने दिल्ली पोलिसांना नोटीस बजावण्यात आली आहे. सर्व गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी करण्यासोबतच कुटुंबाला सुरक्षा देण्याचेही सांगण्यात आले आहे.

अरविंद केजरीवाल यांचे विधान -

याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टि्वट करत ही घटना अत्यंत लज्जास्पद असल्याचे म्हटलं. 'गुन्हेगारांमध्ये एवढी हिंमत कशी आली? मी केंद्रीय गृहमंत्री आणि नायब राज्यपाल यांना विनंती करतो की त्यांनी पोलिसांना कडक कारवाई करण्याच्या सूचना द्याव्यात. कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीकडे लक्ष द्यावे. असे जघन्य गुन्हे आणि गुन्हेगारांना दिल्लीकर कोणत्याही किंमतीत खपवून घेणार नाहीत, असे केजरीवाल यांनी टि्वट करून म्हटलं.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.