ETV Bharat / bharat

प्रिन्स हॅरीचे पंजाबमधील महिलेला लग्नाचे वचन ?, वाचा काय आहे प्रकरण

प्रिन्स हॅरीविरोधात एका महिलेने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. प्रिन्स हॅरीने तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन पाळले नाही, असा दावा त्यात करण्यात आला होता. कोर्टाने ही याचिका फेटाळली आहे. एखाद्या व्यक्तीने बनावट आयडी बनवून हे सर्व केले असावे आणि त्यात कोणतेही सत्य नाही, असे न्यायालयाने म्हटलं.

प्रिन्स हॅरी
प्रिन्स हॅरी
author img

By

Published : Apr 13, 2021, 5:48 PM IST

Updated : Apr 13, 2021, 10:37 PM IST

चंदीगढ - ब्रिटनच्या राजघराण्यातील प्रिन्स हॅरी यांच्याविरोधात चक्क पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयात एका महिलेने तक्रार दाखल केली आहे. महिला वकील असून तीचे पलविंदर कौर आहे. युवराज हॅरीने लग्नाचे आश्वासन दिले होते. मात्र, ते पूर्ण न केल्याचे महिलेने तक्रारीमध्ये म्हटलं आहे. युवराज हॅरीवर कारवाई करण्याची मागणी महिलेने केली आहे.

Woman files petition against Prince Harry of Britain in Punjab Haryana High Court
प्रीन्स हॅरीविरोधात दाखल याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी

अनोख्या अशा प्रकरणावर न्यायमूर्ती अरविंद सिंह सांगवान यांनी सुनावणी केली. मला वाटते की ही याचिका राजकुमार हॅरीशी लग्न करण्याच्या एका दिवसाचे स्वप्न पाहण्यापेक्षा काहीच नाही. याचिका अत्यंत निकृष्ट मार्गाने तयार केली गेली आहे. यात वकिलाच्या ज्ञानाचा अभाव पाहायला मिळत आहे. याचिकेत याचिकाकर्ता आणि प्रिन्स हॅरी यांच्यात काही ईमेलचा उल्लेख आहे. ईमेल पाठविणार्‍या व्यक्तीने स्व:ताची ओळख हॅरी अशी दिलेली पाहायला मिळाली. त्याने महिलेशी लग्न करण्याचे आश्वासन दिल्याचे इमेलमधून स्पष्ट होत आहे.

प्रिन्स हॅरीविरोधात पंजाबमधील महिलेची तक्रार

न्यायालयाचा निर्णय -

न्यायमूर्ती सांगवान यांनी या याचिकेवर निकाल देताना म्हटले की, फेसबुक, ट्विटर इत्यादी विविध माध्यमांच्या वेबसाइटवर बनावट आयडी बनवल्या जातात, हे सर्वांनाच ठाऊक आहे. अशा संभाषणांच्या सत्यतेवर विश्वास ठेवता येत नाही. कथित राजकुमार हॅरी पंजाबमधील खेड्यात एका सायबर कॅफेमध्ये बसल्याची शक्यता आहे. हायकोर्टाने याचिकाकर्त्याबद्दल सहानुभूती दाखवून ही याचिका फेटाळून लावली.

हेही वाचा - शुभवर्तमान! यंदा मान्सून सामान्य राहण्याचा स्कायमेटचा अंदाज!

Last Updated : Apr 13, 2021, 10:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.