रुद्रप्रयाग (उत्तराखंड) : देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या उत्तराखंडमधील बाबा केदारनाथच्या मंदिरावरून पुन्हा एकदा नवा वाद निर्माण झाला आहे. केदारनाथ धामच्या गर्भगृहात लावण्यात आलेल्या सोन्याच्या थरांना पॉलिश करण्यावरून सुरू असलेला वाद थांबला नसतानाच मंदिरातून आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला केदारनाथ मंदिराच्या गर्भगृहात नोटा उडवताना दिसत आहे. व्हिडिओ व्हायरल होताच बद्री केदार टेंपल कमिटी (बीकेटीसी) ने कारवाई केली आहे.
केदारनाथ मंदिराच्या गर्भगृहात महिलेने नोटा उडवल्या : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक महिला केदारनाथ ज्योतिर्लिंगावर पैसे उडवताना दिसत आहे. काही पुजारीही महिलेच्या जवळ उभे आहेत, जे महिलेला रोखण्याचा प्रयत्नही करत नाहीत. हा व्हिडिओ एक आठवडा जुना असल्याचे सांगितले जात आहे, जो दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला.
महिलेची ओळख अद्याप पटली नाही : केदारनाथ धामच्या पवित्र गर्भगृहात एका महिलेने डिस्को बारप्रमाणे नोटा उडवल्याने लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे महिलेजवळ उभे असलेले पुरोहित मंत्रोच्चार करताना दिसत आहेत. ते नोटा उडवणाऱ्या महिलेला रोखण्यासाठी प्रयत्नही करत नाहीत. मात्र, व्हिडिओमध्ये दिसणारी महिला कोण आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
बीकेटीसीने स्पष्टीकरण मागितले : बद्री केदार मंदिर समितीने या व्हिडिओची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. बद्री केदार मंदिर समितीने एक निवेदन जारी केले आहे, ज्यामध्ये समितीने या व्हिडिओची दखल घेत रुद्रप्रयागचे डीएम मयूर दीक्षित आणि पोलिस अधीक्षकांना व्हिडिओची चौकशी करण्यास सांगितले आहे. सोबतच या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. याशिवाय बद्री केदार धामच्या अधिकाऱ्यांकडूनही खुलासा मागवण्यात आला आहे.
महिलेविरुद्ध एफआयआर दाखल : केदारनाथमध्ये पैसे उडवण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रुद्रप्रयागचे डीएम मयूर दीक्षित यांनी महिलेविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. तर, यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या बद्री केदार मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे. यानंतर पोलिसांनी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा :