ETV Bharat / bharat

Winter Session of Parliament : विरोधकांचा गोंधळ; लोकसभेचे कामकाज बुधवारपर्यंत स्थगित

संसदेच्या हिवाळी अधिवेशन कालपासून (29 नोव्हेंबर) सुरू झाले आहे. या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस होता. ( Winter Session of Parliament ) मात्र, संसदेचे कनिष्ठ सभागृहाचे कामकाज आजपासून उद्या 1 डिसेंबरपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. विरोधकांच्या गोंधळामुळे आजचे सभागृहातील कामकाज स्थगित करण्यात आले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेत गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. विरोधकांनी संसदेत गोंधळ घातला. गोंधळातच तीन कृषी कायदे रद्द करण्यात आले. ( Winter Session of Parliament Lok Sabha adjourned till tomorrow )

Parliament
संसद
author img

By

Published : Nov 30, 2021, 4:02 PM IST

नवी दिल्ली - संसदेच्या हिवाळी अधिवेशन कालपासून (29 नोव्हेंबर) सुरू झाले आहे. या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस होता. ( Winter Session of Parliament ) मात्र, संसदेचे कनिष्ठ सभागृहाचे कामकाज आजपासून उद्या 1 डिसेंबरपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. विरोधकांच्या गोंधळामुळे आजचे सभागृहातील कामकाज स्थगित करण्यात आले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेत गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. विरोधकांनी संसदेत गोंधळ घातला. गोंधळातच तीन कृषी कायदे रद्द करण्यात आले. ( Winter Session of Parliament Lok Sabha adjourned till tomorrow )

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मोठे नाट्य घडले आहे. राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी 12 खासदारांना हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित ( 12 Rajya Sabha MPs suspended ) केले आहे. गैरवर्तणूक आणि नियमबाह्य वागणुकीमुळे ही कारवाई केल्याचे सभापती नायडू यांनी म्हटले. यानंतर संसद के हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधकांनी गोंधळ केला. 12 खासदारांचे निलंबन हे बेकायदेशीर असल्याचे विरोधकांनी म्हटले. तसेच यानंतर ते सभागृहातून बाहेर पडले. यासर्व पार्श्वभूमीवर संसदेचे कनिष्ठ सभागृहाचे कामकाज आजपासून उद्या 1 डिसेंबरपर्यंत स्थगित करण्यात आले आहे.

हेही वाचा - Mamta Banerjee Mumbai Visit : ममता बॅनर्जी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता

हे खासदार झाले निलंबित

काँग्रेसच्या फुलो देवी नेतम, छाया वर्मा, रिपून बोरा, राजमणी पटेल, सय्यद हुस्सैन आणि अखिलेश सिंह यांचे निलंबन झाले आहे. शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी, अनिल देसाई, तृणमूलच्या डोला सेन, शांता छेत्री यांचे सभापतींनी निलंबन केले आहे.

देशातील शेतकऱ्यांनी 26 नोव्हेंबर 2020 पासून केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात (Farm Law) आंदोलन सुरू केले होते. काल या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झालं. अखेर शेतकऱ्यांच्या मागणीपुढे सरकार झुकलं आणि कृषी कायदे रद्द ( Farm Laws Repealed) करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. कायदे मागे घेतले असले तरी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरुच राहणार आहे. आम्ही आमचा संघर्ष सुरुच ठेवणार अशी भूमिका आंदोलक शेतकऱ्यांनी घेतली आहे. शेतमालाला कायदेशीर हमी आणि सर्व शेतमालाला योग्य भाव मिळावा, आदी मागण्यासाठी हे आंदोलन सुरूच राहणार आहे. तसेच वीज दुरुस्ती विधेयक अद्याप मागे घेतलेले नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.