ETV Bharat / bharat

Winter Session 2022 : तवांग संघर्षाचा मुद्दा आज संसदेत गाजणार; संसदेत गदारोळ होण्याची शक्यता

अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये ( Tawang Issue ) भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीला विरोधक हल्लाबोल करत होते. आज या मुद्द्यावरून संसदेत गदारोळ होण्याची शक्यता आहे. ( Parliament Political Parties Raise Tawang Issue )

Winter Session 2022
हिवाळी अधिवेशन २०२२
author img

By

Published : Dec 13, 2022, 9:12 AM IST

Updated : Dec 13, 2022, 11:53 AM IST

नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशातील तवांग ( Tawang Issue ) सेक्टरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (एलएसी) 9 डिसेंबर रोजी भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झटापट झाली, ज्यात दोन्ही बाजूंचे जवान किरकोळ जखमी झाले. ३० महिन्यांहून अधिक काळ पूर्व लडाखमधील दोन्ही बाजूंच्या सीमारेषेदरम्यान गेल्या शुक्रवारी संवेदनशील भागात एलएसीवरील यांगत्सेजवळ झटापट झाली. ( Parliament Political Parties Raise Tawang Issue )

जवानांना गुवाहाटी रुग्णालयात दाखल : भारतीय लष्कराने एका निवेदनात म्हटले आहे की, आमच्या सैन्याने चिनी सैन्याचा निर्धाराने सामना केला. या झटापटीत दोन्ही बाजूचे काही सैनिक किरकोळ जखमी झाले. दोन्ही बाजूंनी तातडीने या भागातून माघार घेतल्याचेही लष्कराने सांगितले. यानंतर आमच्या कमांडरने प्रस्थापित यंत्रणेनुसार शांतता प्रस्थापित करण्यासाठी चीनी समकक्षासोबत 'फ्लेग मीटिंग' घेतली. लष्कराच्या सहा जवानांना गुवाहाटी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

काँग्रेस हा मुद्दा संसदेत मांडणार : या मुद्द्यावर आज संसदेत गदारोळ होण्याची शक्यता आहे. तवांग प्रकरणी विरोधी पक्षांनी सरकारला आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे. सरकारवर हल्लाबोल करत काँग्रेसने म्हटले आहे की, चीन असा उद्धटपणा वारंवार कसा करत आहे. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही पंतप्रधान मोदींकडे उत्तर मागितले आहे. सरकारवर ताशेरे ओढत काँग्रेसने म्हटले की, सूत्रांकडून इतक्या मोठ्या बातम्या येत आहेत, सरकार कुठे आहे.

Last Updated : Dec 13, 2022, 11:53 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.