ETV Bharat / bharat

Mahua Moitra: 'हिंदूंना धोका आहे' असे म्हणत भाजपची 2024 ची तयारी, महुआ मोईत्रांची टीका - तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा ट्विट

आपल्या वक्तव्यांवरून ट्विट केल्यामुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी पुन्हा एकदा रामनवमीच्या निमित्ताने भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. खासदार महुआ मोईत्रा यांनी राम नवमीच्या मुद्द्यावर ट्विट करत आता हे भाजपकडून 'हिंदूंना धोका आहे' असे म्हणणे (2024)पर्यंत चालेल असा जोरदार टोला लगावला आहे. तसेच, देव यांना बुद्धी देवो असही त्या म्हणाल्या आहेत.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Apr 1, 2023, 5:48 PM IST

Updated : Apr 1, 2023, 6:00 PM IST

कोलकाता : पश्चिम बंगालमधील जातीय हिंसाचारावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडजंगी झाली आहे. खासदार महुआ मोईत्रा यांनी जोरदार टीका केली आहे. मोईत्रा यांनी ट्विट केले की, 'रामनवमीच्या दिवशी भाजपने 'हिंदूंना धोका आहे' अशी भीती वर्तवली आहे. ही परिस्थिती 2024 पर्यंत राहील असा टोलाही त्यांनी लगावला आहे. भारताला लक्ष्य करणारी विदेशी शक्ती हळू-हळू पुढे जात आहे. तसेच, हिंदू कार्ड हे एकमेव आहे ज्या माध्यमातून लोकांना भडकवता येते. दरम्यान, जय मां काली. आई बुद्धी दे, माझा देश वाचव असही ते म्हणाले आहेत.

  • The “Hindus are in danger” narrative started full flow by @BJP as of Ramnavami. Will go on till 2024.

    Pak attack, Foreign forces targeting India bakwas running slow this time. Only fool-proof fallback is Hindu card.

    Jai Maa Kali. Buddhi de maa. Save my country.

    — Mahua Moitra (@MahuaMoitra) April 1, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

भाजप 2024 ची तयारी करत आहे : तृणमूल खासदार महुआ मोइत्रा यांनी सांगितले की, भाजप 2024 साठी रोडमॅप तयार करत आहे. मोइत्रा म्हणाल्या भाजपच्या मते हिंदूंना धोका असल्याचे म्हटले जात आहे. भाजप 2024 पर्यंत हेच चालू ठेवेल. भाजपला हिंदूंचा पाठिंबा मिळवायचा असल्याने ते असे करत असतात. असे म्हणत किंवा दुफळी निर्माण करत भाजपच जमीन तयार करत आहे ज्यावर त्यांचे राजकारण चालते असही त्या म्हणाल्या आहेत.

अनेक गाड्या जाळण्यात आल्या : 30 मार्च रोजी सायंकाळी हावडा शहरातील काजीपारा येथून रामनवमीची मिरवणूक काढताना दोन गटांमध्ये हाणामारी झाली. या हिंसाचारात दुकानांची तोडफोड करण्यात आली. पोलिसांच्या काही वाहनांसह अनेक गाड्या जाळण्यात आल्या आहेत. या भागात शुक्रवारी दुपारी पोलिसांवर स्थानिकांनी दगडफेकीच्या ताज्या घटना पाहिल्या, त्यानंतर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले. तसेच, इंटरनेट सेवाही खंडित करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू असूनही, परिस्थिती शांततापूर्ण आणि नियंत्रणात आहे. वृत्तसंस्था पीटीआयने एका पोलीस अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की, परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात असताना सकाळपासून वाहतूक सुरू झाली आणि दुकाने आणि बाजारपेठाही सुरू झाल्या आहेत.

दोषी आढळल्यास त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई : ते म्हणाले की, इंटरनेट कनेक्शन अद्याप सुरू करण्यात आलेले नाही. सध्या, कलम 144 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश अद्यापही लागू आहेत. ज्या भागात चकमकी दरम्यान अनेक दुकाने आणि घरांची तोडफोड झाली होती. राज्य सीआयडीने चकमकीची चौकशी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी शुक्रवारी-शनिवारी रात्री छापेमारी सुरूच ठेवली आणि तोडफोडीत सहभागी असल्याच्या आरोपावरून आणखी काही लोकांना अटक केली. ते म्हणाले, 'त्या दिवशी घटनास्थळावरून मिळालेल्या व्हिडिओ फुटेजवरून आम्ही त्यांच्या सहभागाची खात्री करू आणि त्यामध्ये दोषी आढळल्यास त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई केली जाईल असे ते म्हणाले आहेत.

भाजपने बॅनर्जींचे आरोप फेटाळून लावले : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी रामनवमीच्या मिरवणुकीत हावडा येथील काजीपारा भागात झालेल्या हिंसाचारामागे भाजप आणि इतर उजव्या संघटनांचा हात असल्याचा आरोप केला. त्यानंतर भाजपने बॅनर्जींचे आरोप फेटाळून लावले आहेत. या प्रकरणाची एनआयएमार्फत चौकशी करावी, अशी मागणी भाजपने केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांच्याशी हावडा येथील रामनवमी मिरवणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचाराबद्दल बोलून परिस्थितीचा आढावा घेतला.

हेही वाचा : Teacher Scam : पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळा! अयान शीलच्या १०० कोटींच्या संपत्तीचा ईडीकडून आढावा

Last Updated : Apr 1, 2023, 6:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.