ETV Bharat / bharat

पंजाब : काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी नवज्योत सिंग सिद्धू यांच्या नावाची चर्चा

author img

By

Published : Jul 15, 2021, 9:05 AM IST

पंजाब काँग्रेसचे नेते व आमदार नवज्योत सिंग सिद्धू यांची पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीचे (पीसीसी) प्रमुख पदी नियुक्ती करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे सिद्धू काँग्रेससोडून आम आदमी पक्षाचा हात धरणार असल्याची चर्चांही सुरू आहेत.

पंजाब काँग्रेस
Punjab Congress

नवी दिल्ली - पंजाबमधल्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागलं आहे. पंजाब काँग्रेसचे नेते व आमदार नवज्योत सिंग सिद्धू यांची पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीचे (पीसीसी) प्रमुख पदी नियुक्ती करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे सिद्धू काँग्रेससोडून आम आदमी पक्षाचा हात धरणार असल्याची चर्चांही सुरू आहेत.

पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत

पंजाब काँग्रेसमधील फेरबदलासंदर्भात अंतिम घोषणा येत्या 2-3 दिवसांत केली जाईल. परंतु, अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याची माहिती काँग्रेस पक्षाच्या उच्चस्तरीय सूत्रांनी दिली. काँग्रेसने सर्व स्तरांवर सल्लामसलत केली आहे. त्यामुळे पक्षात कोणत्याही प्रकारची नाराजी होण्याची शक्यता नाही, असे पक्षाचे वरिष्ठ नेते म्हणाले.

पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत बुधवारी पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत यांची बैठक होणार होती. तथापि, काही कारणांमुळे बैठक झाली नसल्याचे रावत यांनी गांधींच्या निवासस्थानावरून परत जात असताना पत्रकारांना सांगितले. सिद्धू यांच्या नियुक्तीच्या चर्चेबद्दल विचारले असता, त्यांनी सांगितले, की काँग्रेस हायकमांड सर्व निर्णय घेईल. माझ्या हातात कागद आल्यानंतर मी लगेचच जाहीर करेन.

पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या कार्यशैलीबद्दल अनेक आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, पंजाबमध्ये पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी कॅप्टन अमरिंदरसिंग यांना पर्याय नाही आणि म्हणूनच आगामी 2022 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका त्यांच्या नेतृत्वात लढवल्या जातील. आता पुढील वर्षात विधानसभा निवडणूक होणार असल्याने, काँग्रेस हायकमांड हा अंतर्गत कलह मिटवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे.

पंजाबमधील राजकीय समीकरण -

पंजाब विधानसभा निवडणूक 2017 साली पार पडली होती. यावेळी 117 जागांसाठी मतदान पार पडले. 11 मार्च 2017 रोजी मतगणना केली गेल्यावर काँग्रेस पक्षाला 77 जागा मिळाल्याचे निष्पन्न झाले. अकाली दल व भाजपा युतीला जोरदार पराभवाचा सामना करावा लागला. आम आदमी पार्टीला देखील अपेक्षित यश मिळाले नाही. 2022 च्या विधानसभा निवडणुकीत अकाली दल व भाजपाची युती तुटली आहे. शिरोमणी अकाली दल आणि बहुजन समाज पक्ष सोबत लढणार आहेत. यामुळं पंजाबमधील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - 'सारा पंजाब सिद्धू नाल', अमृतसरमध्ये नवज्योत सिद्धू यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.