ETV Bharat / bharat

Man Wearing Women Clothes : पती घालतो महिलांचे कपडे, लावतो लिपस्टिक...पत्नीची थेट पोलिस ठाण्यात धाव! - Woman harassed for dowry in Bangalore

बेंगळुरू मधील एका महिलेने पती महिलांसारखे वागतो आणि हुंड्यासाठी छळ करतो म्हणून पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तिच्या तक्रारीवरून पती आणि त्याच्या कुटुंबियांविरुद्ध गुन्हा काखल करण्यात आला आहे.

crime
क्राइम
author img

By

Published : Apr 1, 2023, 9:07 AM IST

बेंगळुरू : पती लिपस्टिक लावतो आणि महिलांचे अंतर्वस्त्र घालतो, असा आरोप करत बेंगळुरू मधील एका पत्नीने चक्क पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. पती महिलांच्या कपड्यांमध्ये विचित्र वागतो शिवाय हुंड्याच्या बहाण्याने माझा छळ देखील करतो, असा आरोप पत्नीने केला आहे. छळाविरोधात महिलेने पती आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या संदर्भात बंगळुरूमधील कुमारस्वामी लेआउट पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 25 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीवरून तिचा पती, सासरा आणि सासू यांच्याविरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोघांची मॅट्रिमोनी वेबसाईटद्वारे भेट : आरोपी पती आणि पीडित पत्नीची तीन वर्षांपूर्वी एका मॅट्रिमोनी वेबसाइटद्वारे भेट झाली होती. पतीने एम.टेक. केले असून तो चांगल्या पगाराची नोकरी करतो, अशी माहिती मिळाली आहे. 2020 मध्ये या दोघांनी नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न केले. यावेळी महिलेने पतीला हुंडा म्हणून 800 ग्रॅम सोने, 1 किलो चांदी आणि 5 लाख रुपये दिले होते. लग्नाच्या पहिल्या रात्री पतीने आरशासमोर उभे राहून लिपस्टिक लावली. नंतर त्याने महिलांचे अंतर्वस्त्र देखील परिधान केले. यावरून तिने त्याला प्रश्न केला असता तो म्हणाला की, त्याला पुरुष खूप आवडतात.

सासूनेही केला मानसिक छळ : लॉकडाऊनच्या दरम्यान या दोघांमध्ये दररोज भांडणे होत होती. त्याचे विचित्र वागणे दिवसेंदिवस वाढत असल्याने पाहून पत्नीच्या सासूने त्याला दवाखान्यात दाखवण्यासाठी तिच्याकडे 10 लाख रुपयांची मागणी केली. यासाठी तिने तिचा छळ देखील सुरू केला. हा छळ सहन न झाल्याने घराबाहेर पडल्याचे महिलेने तक्रारीत नमूद केले आहे. त्यानंतर ती महिला तिच्या भावाच्या घरी राहायला गेली. मात्र तेथेही तो तिचा मानसिक छळ करतच होता.

हे ही वाचा : International Transgender Day of Visibility : समानतेच्या गप्पा मारून ट्रान्सजेंडरला अधिकार मिळणार का? किन्नर आखाड्याने मांडले रोखठोक मत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.