सेंट किट्स: भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिज विरुद्ध 2 ऑगस्ट रोजी रात्री 9.30 वाजता सेंट किट्स येथील वॉर्नर पार्क स्टेडियमवर तिसरा T20 सामना ( WI vs IND 3rd T20I ) खेळणार आहे. दुसरा T20 सामना 1 ऑगस्ट रोजी खेळला गेला, ज्यामध्ये भारताचा 5 विकेट्सनी पराभव झाला. भारतीय संघाने पहिला सामना 68 धावांच्या फरकाने जिंकला होता. पाच सामन्यांची मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. याआधी भारताने तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकली होती. तिसऱ्या टी-20 सामन्यासाठी पाहूया आजची ड्रीम 11 टीम ( Todays Dream11 Team ).
ऋषभ पंतला कर्णधार बनवा -
यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत ( Batsman Rishabh Pant ) चांगल्या फॉर्ममध्ये आहे. दुसऱ्या टी-२० सामन्यातही त्याने झटपट सुरुवात केली. मात्र, त्याचे मोठ्या डावात रूपांतर त्याला करता आले नाही. पंतने 12 चेंडूत दोन षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने 24 धावा केल्या. यष्टिरक्षक म्हणूनही पंत तुम्हाला काही गुण मिळवून देऊ शकतो.
जेसन होल्डर उपकर्णधार -
जेसन होल्डर ( All-rounder Jason Holder ) हा वेस्ट इंडिजचा सर्वात विश्वासू खेळाडू आहे. जेव्हा तो फलंदाजीला येतो, तेव्हा तो तुम्हाला काही विकेट मिळवून देईल आणि काही धावा देखील करेल. याशिवाय, सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना, तो झेलमधून महत्त्वाचे गुण देखील मिळवू शकतो.
वेस्ट इंडिज विरुद्ध भारत 3रा T20I ड्रीम 11 संघ : ऋषभ पंत, रोहित शर्मा, काइल मायर्स, ब्रँडन किंग, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, जेसन होल्डर, भुवनेश्वर कुमार, रविचंद्रन अश्विन आणि ओबेद मॅकॉय.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन -
वेस्ट इंडिज: काइल मेयर्स, ब्रँडन किंग, निकोलस पूरन (कर्णधार), रोव्हमन पॉवेल, शिमरॉन हेटमायर, डेव्हॉन थॉमस (विकेटकीपर), जेसन होल्डर, अकिल होसेन, ओडियन स्मिथ, अल्झारी जोसेफ आणि ओबेद मॅककॉय.
टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, दिनेश कार्तिक, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, आवेश खान / रवी बिश्नोई आणि अर्शदीप सिंग.
हेही वाचा - Cwg 2022 : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भारताचे पाचव्या दिवसाचे वेळापत्रक