ETV Bharat / bharat

राजीनाम्याचे दुःख लपवू शकले नाही रावत, म्हणाले...'राजीनाम्याचे कारण दिल्लीला जाऊन विचारा'

उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी मंगळवारी आपला राजीनामा राज्यपालांकडे सोपवला आहे. राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना ते आपले दुःख लपवू शकले नाहीत. राजीनाम्याचे कारण दिल्लीला जाऊन विचारा, असे पत्रकार परिषदेत बोलताना रावत म्हणाले.

मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत
मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत
author img

By

Published : Mar 10, 2021, 7:15 AM IST

डेहराडून - उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी मंगळवारी आपला राजीनामा राज्यपालांकडे सोपवला आहे. राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना ते आपले दुःख लपवू शकले नाहीत. राजीनाम्याचे कारण दिल्लीला जाऊन विचारा, असे पत्रकार परिषदेत बोलताना रावत म्हणाले. आज नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात येईल. बुधवारी 10 वाजता आमदार गटाची बैठक होणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून पक्षासाठी कार्य करत आहे. पक्षाने मला 4 वर्षे सेवा देण्याची संधी दिली. त्यामुळे मी सर्वांचे आभार मानतो. हे माझे सौभाग्य होते. एका छोट्या गावात माझा जन्म झाला. वडील सैनिक होते. एवढे मोठे पद मला पक्ष देईल. याची कल्पनाही केली नव्हती. मात्र, पक्षाने जबाबदारी दिली, असे ते म्हणाले.

रावत यांना राजीनाम्याचे दुःख -

पक्षाने विचार करून सामूहिकरित्या हा निर्णय घेतला आहे. आता इतर कुणाला तरी संधी द्यायला हवी. 4 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यासाठी अद्याप 9 दिवस बाकी आहेत, असेही ते म्हणाले. तसेच पत्रकारांनी राजीनामा देण्याचे कारण विचारले असता ते म्हणाले, कारण शोधण्यासाठी तुम्हाला दिल्लीला जावे लागेल.

रावत यांच्यावर आमदार नाराज -

पुढील वर्षी राज्यातील निवडणूक पाहता पक्षश्रेष्ठींनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. पक्षाचे आमदार रावत यांच्यावर नाराज असल्याचे वृत्त आहे. त्यांची नोकरशाहीबाबत जास्त तक्रार आहे. राज्याच्या अनेक आमदारांनी काही महिन्यांपूर्वी दिल्लीत येऊन राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांची भेट घेतली होती. तथापि, मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आता राज्यमंत्री धनसिंह रावत यांचे नाव सर्वात पुढे आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.