ETV Bharat / bharat

Son Murdered Mother: मुलाने केली आईची हत्या.. वडील, नातेवाइकांवरच व्यक्त केला हत्येचा संशय. मग झाला उलगडा.. - मुलाने केली आईची हत्या

Son Murdered Mother: दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात एका मुलाने स्वतःच्या आईची हत्या करून वडील आणि नातेवाइकांवरच हत्येचा संशय व्यक्त केला. मात्र पोलिसांनी याचा उलगडा करून मारेकरी मुलाच्या मुसक्या आवळल्या. son kill his mother in south Kashmir

Why did a son kill his mother in south Kashmir
मुलाने केली आईची हत्या
author img

By

Published : Nov 2, 2022, 5:58 PM IST

अनंतनाग: Son Murdered Mother: दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील केहरीबल गावात एका तरुणाने आपल्या आईची हत्या केली आणि वडील अन् त्याच्या नातेवाईकांना दोष देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या विसंगत वक्तव्यावरून पोलिसांनी मारेकऱ्याच्या मुसक्या आवळल्या. son kill his mother in south Kashmir

ही हत्या ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात घडली होती, मात्र अनेक दिवस या कटाचा पोलिसांना सुगावा लागला नाही. मृताच्या मुलाची सतत चौकशी केली असता, महिलेच्या मुलाने आपल्या जवळच्या मित्राच्या मदतीने तिची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.

४५ वर्षीय महिला रझिया अख्तर हिचा घराच्या स्लॅबवरून पडून मृत्यू झाल्याची माहिती होती. परंतु रझियाच्या मुलाने तिचा खून केल्याचा आरोप केला आणि दोष त्याच्या वडिलांवर आणि जवळच्या नातेवाईकांवर ठेवला. रझियाचा घटस्फोट झाला होता आणि तिच्या पतीने नुकतेच दुसरे लग्न केले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करून कसून चौकशी सुरू करण्यात आली.

तपासादरम्यान महिलेचा मृत्यू छतावरून पडून झाला नसून, तिच्या मुलाने आपल्या एका मित्राच्या मदतीने हा खून केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेचा मुलगा आकिब मंजूर खान याने हत्येची कबुली देताना सांगितले की, त्याने त्याचा मित्र आबिद हुसेन गनई याच्या मदतीने घरातील स्वयंपाकघरात आईकडून पैसे हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. तिला खाली पाडले. तसेच तिच्या डोक्यात दगडाने वार करून ती रक्ताच्या थारोळ्यात टाकले. यावेळी तिचा तत्काळ मृत्यू झाला.

आरोपीने पुढे सांगितले की, हत्येचा अपघात झाल्याचे भासवण्यासाठी त्याने आपल्या मित्रासोबत आईचा मृतदेह घराबाहेर आणला आणि घराच्या छतावर चप्पल टाकून तिचा छतावरून पडून मृत्यू झाला असे दाखवले. पोलिसांनी घटनास्थळावरून पुरावे गोळा केले असून, गुन्ह्यात वापरलेले हत्यारेही जप्त करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलीस करत असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. या हत्येचा पोलिस तपास अजूनही सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.