ETV Bharat / bharat

WHO WARNING डेल्टाचा स्ट्रेन सतत बदलत असल्याने जग अत्यंत धोकादायक स्थितीत - WHO chief on Delta variant

डेल्टा व्हेरियंट हा पहिल्यांदा भारतात आढळला होता. त्यानंतर डेल्टा व्हेरियंट हा १०० हून अधिक देशांमध्ये आढळला आहे. या स्ट्रेनबाबत जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी इशारा दिला ाहे.

WHO CHIEF
जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधनोम घेब्रायसस
author img

By

Published : Jul 3, 2021, 3:16 PM IST

संयुक्त राष्ट्रसंघ (जीनेव्हा) - कोरोनाचा डेल्टा स्ट्रेन अत्यंत संसर्गजन्य होत असल्याने जग हे अत्यंत धोकादायक स्थितीत आहे. हा डेल्टा कोरोना सतत बदलत असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधनोम घेब्रायसस यांनी दिला आहे. ज्या देशांमध्ये लसीकरण कमी झाले आहे, त्या देशांमध्ये रुग्णालये आणखी भरत असल्याचे भयानक दृश्य दिसत आहे, याकडे आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी पत्रकार परिषदेत लक्ष वेधले.

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधनोम घेब्रायसस म्हणाले, की डेल्टा हा स्ट्रेन अनेक देशांमध्ये वाढला आहे. अजून कोणताही देश या धोक्यापासून दूर नाही. कोरोना सतत बदलत असल्याने सार्वजनिक आरोग्य यंत्रणेला बदलून प्रतिसाद दिला पाहिजे. डेल्टा व्हेरियंट हा 98 हून अधिक देशांमध्ये आढळला आहे.

हेही वाचा-कोव्हॅक्सीन कोरोनाच्या अल्फा-डेल्टा व्हेरायंटवरही परिणामकारक, अमेरिकेच्या NIH चा दावा

जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी या सुचविल्या उपाययोजना-

  • कमी आणि अधिक लसीकरण असलेल्या देशांमध्येही डेल्टाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. कोरोनाचे प्रमाण कमी करण्यासाठी देशांपुढे दोन महत्त्वाचे मार्ग आहेत.
  • सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक उपाययोजना त्यामुळे देखरेखीसाठी बळकट यंत्रणा होणे शक्य आहे.
  • कोरोनाच्या चाचण्या, कोरोनाचे लवकर निदान, विलगीकरण आणि वैद्यकीय देखभाल या बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहे.
  • मास्क, शारीरिक अंतर, गर्दीच्या जागा टाळणे आणि घरामध्ये पुरेशी हवा खेळती राहणे अशा उपाययोजना कराव्यात.
  • पुढील वर्षापर्यंत जगातील प्रत्येक देशांमध्ये 70 टक्के लसीकरण होण्यासाठी जगभरातील नेत्यांनी एकत्रित यावे, असे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी केले.
  • कोरोना महामारीचा वेग कमी करणे, लोकांचे प्राण वाचविणे आणि जागतिक अर्थव्यवस्था खरोखर सावरण्याकरिता उत्कृष्ट मार्ग आहे. त्यामुळे अधिक धोकादायक कोरोनाच्या व्हेरियंटपासून वाचता येणे शक्य होणार आहे.
  • वर्षाखेर जगभरातील सर्व देशांमध्ये किमान 10 टक्के लसीकरण व्हावे, असे आवाहनही त्यांनी जागतिक नेत्यांना केले.

बायोएनटेक, फायझर आणि मॉर्डना या कंपन्यांनी वेगाने लस उत्पादन करण्यासाठी माहिती द्यावी, असे आवाहन आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी केले. जर आपण लशींचे हब आणि जागतिक लसीकरणाची क्षमता वाढविली तर प्राणघातक विषाणू नष्ट होईल.

हेही वाचा-Aamir Kiran Divorce : १५ वर्षांचे सहजीवन संपले, आमिर खान आणि किरण राव यांचा घटस्फोट

डेल्टा व्हेरियंट हा पहिल्यांदा भारतात आढळला होता. त्यानंतर डेल्टा व्हेरियंट हा 100 हून अधिक देशांमध्ये आढळला आहे. येत्या काही महिन्यात डेल्टा व्हेरियंट हा जगभरात आढळेल, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने मागील आठवड्यात दिला होता.

डेल्टा की डेल्टा प्लस घातक?

डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत डेल्टा प्लस अधिक विषाणूयुक्त आहे का? या प्रश्नावर आयसीएमआरचे माजी प्रमुख वैज्ञानिर डॉ. गंगाखेडकर म्हणाले, की 'आतापर्यंत आम्हाला माहिती आहे, की डेल्टा व्हेरिएंटमध्ये दोन श्रेणीबद्ध म्यूटेशन आढळले आहेत. त्यातील L452R हा एक आहे. या विशिष्ट म्यूटेशनमुळे उच्च संक्रमणाची भर पडते. हे अधिक कार्यक्षम आहे. त्यामुळे हा एका व्यक्तीपासून दुसऱ्याकडे लवकर पसरतो. तर, आणखी एक म्यूटेशन दिसून आला आहे. ज्याला P871R म्हणतात. हा सर्वात गंभीर परिवर्तनांपैकी एक आहे. याने शरीरात प्रवेश केल्यास एस 1 आणि एस 2 प्रथिने तयार होतात", असे डॉ. गंगाखेडकरांनी म्हटले. साधारणपणे पेशींमध्ये प्रवेश केल्यानंतर हा विषाणू व्यक्तीच्या स्वतःच्या सेल्युलर मशिनरीचा वापर करून अधिक विषाणू तयार करतो, जो मूळ पेशीच्या मृत्यूमुळे फुटतो. त्यामुळे विषाणू मुक्तपणे बाहेर येतो आणि सर्वत्र पसरतो' असेही गंगाखेडकर म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.