ETV Bharat / bharat

Layoff News : 12 दिवसांमध्ये कंपन्यांनी 17 हजार तांत्रिक कर्मचाऱ्यांना दिला डच्चू - किती कर्मचार्‍यांनी त्यांच्या नोकऱ्या गमावल्या

वर्ष २०२२ पासून कंपन्यांमध्ये टाळेबंदीची प्रक्रिया सुरू आहे. एकापाठोपाठ एक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना नोकरीतून बाहेरचा रस्ता दाखवत आहेत. तंत्रज्ञान क्षेत्र यात आघाडीवर आहे. जगभरात, फेब्रुवारी महिन्यात तंत्रज्ञान उद्योगातील 17,400 हून अधिक कर्मचार्‍यांनी त्यांच्या नोकऱ्या गमावल्या आहेत. भारतातही अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. या अहवालात जाणून घेऊया की, फेब्रुवारी महिन्यात कोणत्या कंपनीने किती कर्मचारी कमी केले.

Layoff News
17 हजार तांत्रिक कर्मचाऱ्यांना डिच्चू
author img

By

Published : Feb 12, 2023, 7:48 PM IST

नवी दिल्ली : ट्विटरमधुन कर्मचारी कमी करण्याची प्रक्रिया सुरुच आहे. तेव्हा आज आपण जाणून घेऊया की किती कंपन्या कर्मचारी काढण्याची ही प्रक्रिया थांबवणार आहे? की टाळेबंदीची ही प्रक्रिया अशीच सुरू राहणार ते? वृत्तसंस्था INS कडून मिळालेल्या माहितीनुसार, 2023 मध्ये केवळ फेब्रुवारी महिन्यातच जागतिक स्तरावर 17,400 लोकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. त्याच वेळी, जानेवारी महिन्यात सुमारे 1 लाख लोकांना कमी करण्यात आले. जगभरात 2022 ते 2023 या कालावधीत टाळेबंदीबद्दल बोललो तर, आतापर्यंत 2.5 लाखांहून अधिक तंत्रज्ञान कामगारांनी त्यांच्या नोकऱ्या गमावल्या आहेत. Yahoo, Byju's, GoDaddy, GitHub, eBay, Auto Desk, OLX Group आणि इतर या प्रमुख कंपन्यांपैकी आहेत, ज्यांनी फेब्रुवारी महिन्यात टाळेबंदी सुरू केली. जाणून घेऊया कोणत्या कंपनीने किती कर्मचाऱ्यांना काढले.

Yahoo मध्ये टाळेबंदी : Yahoo चे CEO जिम लॅन्झन यांनी जाहीर केले की, ते त्यांच्या 1,600 कर्मचाऱ्यांना काढून टाकत आहेत. ही टाळेबंदी कंपनी दोन भागात करणार आहे. पहिल्या टप्प्यात, कंपनी आपल्या 12 टक्के कर्मचाऱ्यांना म्हणजे सुमारे 1,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहे. यानंतर, कंपनी पुढील सहा महिन्यांत आणखी 8 टक्के, ज्यात 600 कर्मचार्‍यांना कमी करेल. इतर व्यवसायांमध्ये अधिक गुंतवणूक करण्यासाठी कंपनीने ही टाळेबंदी केली.

Layoff News
17 हजार तांत्रिक कर्मचाऱ्यांना डिच्चू

Byju's मध्ये टाळेबंदी : Edtech प्रमुख Byju's ने दोन टप्प्यात 2500 कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. कंपनीने 5 फेब्रुवारी रोजी सुमारे 1,500 कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकले होते, यापूर्वी 2 फेब्रुवारी रोजी कंपनीने 1,000 हून अधिक कर्मचार्‍यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. जे त्यांच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या 15 टक्के होते. कामावरून काढण्यात आल्याचा सर्वाधिक फटका अभियंता कर्मचाऱ्यांना बसला.

Layoff News
17 हजार तांत्रिक कर्मचाऱ्यांना डिच्चू

GoDaddy मध्ये टाळेबंदी : GoDaddy चे CEO अमन भुतानी यांनी आपल्या 8 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा केली आहे. कर्मचार्‍यांना ईमेलमध्ये, भुतानी म्हणाले की बहुतेक टाळेबंदी यूएस मध्ये आहे, ज्यामुळे कंपनी आणि प्रत्येक विभागातील अनेक स्तरांवर परिणाम होतो. नियोजित परिणामांमध्ये आमचे तीन ब्रँड मीडिया टेंपल, मेन स्ट्रीट हब आणि 123 रेग, GoDaddy मध्ये अधिक खोलवर समाकलित करण्यासाठी चालू असलेल्या कामाचा समावेश आहे, असे त्यांनी लिहिले.

Layoff News
17 हजार तांत्रिक कर्मचाऱ्यांना डिच्चू

GitHub मध्ये टाळेबंदी : GitHub, Microsoft च्या मालकीचे ओपन सोर्स डेव्हलपर प्लॅटफॉर्म, ने त्यांच्या 10 टक्के कर्मचार्‍यांना काढून टाकण्याची घोषणा केली आहे. म्हणजे कंपनीच्या 300 कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागतील. टाळेबंदी जाहीर होण्यापूर्वी, गिटहबमध्ये सुमारे 3,000 कर्मचारी होते. भविष्यात आपल्या ग्राहकांची संख्या कमी होण्याच्या अपेक्षेने गिथबने हा निर्णय घेतला आहे.

Layoff News
17 हजार तांत्रिक कर्मचाऱ्यांना डिच्चू

eBay Inc मध्ये टाळेबंदी: eBay Inc. अंदाजे 500 कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकत आहे. कंपनीने म्हटले आहे की, ते फक्त 4 टक्के कर्मचारी काढत आहेत. कंपनीचे ४ टक्के कर्मचारी म्हणजे आता जागतिक स्तरावर एकूण ५०० कर्मचाऱ्यांना कंपनीतून काढून टाकण्यात आले आहे. कंपनीने आपला नफा वाढवण्याच्या उद्देशाने छाटणी केली आहे.

Layoff News
17 हजार तांत्रिक कर्मचाऱ्यांना डिच्चू

ओएलएक्समध्ये टाळेबंदी: ओएलएक्स ग्रुप भारतासह जगभरातील 15 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहे. मात्र, त्यात भारतीयांची संख्या किती आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ओएलएक्स ग्रुपने आपल्या एकूण 1500 कर्मचाऱ्यांना कंपनीला अलविदा करण्यास सांगितले आहे. जागतिक स्तरावर बदलती आर्थिक परिस्थिती पाहता कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

Layoff News
17 हजार तांत्रिक कर्मचाऱ्यांना डिच्चू

हेही वाचा : Layoff News : तुमचीपण नोकरी जाणा्र? 2023 मध्ये 1 लाखाहून अधिक लोकांनी नोकऱ्या गमावल्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.