ETV Bharat / bharat

Bharat Jodo Yatra :भारत जोडो यात्रा पोहोचणार महाराष्ट्रात, कोण-कोणते नेते राहणार उपस्थित? वाचा सविस्तर

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी ( Rahul Gandhi Bharat Jodo Yatra) पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांसह कन्याकुमारीपासून भारत जोडो यात्रेला सुरुवात केली. त्याचवेळी काँग्रेसची भारत जोडो यात्रा ( Bharat Jodo Yatra ) आज रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात दाखल होणार आहे. यावेळी त्यांच्यासोबत कोण कोणते नेते राहतील हे पाहणे गरजेचे ठरणार आहे.

author img

By

Published : Nov 7, 2022, 9:39 AM IST

Bharat Jodo Yatra
भारत जोडो यात्रा

हैदराबाद : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी ( Rahul Gandhi Bharat Jodo Yatra) पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांसह कन्याकुमारीपासून भारत जोडो यात्रेला सुरुवात केली. त्याचवेळी काँग्रेसची भारत जोडो यात्रा ( Bharat Jodo Yatra ) आज रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात दाखल होणार आहे. जनतेशी जोडण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून काढण्यात आलेली ही यात्रा महाराष्ट्रात 14 दिवस चालणार असून 15 विधानसभा आणि सहा लोकसभा मतदारसंघातून ती जाणार आहे. त्याचवेळी राहूल गांधी 10 आणि 18 नोव्हेंबर रोजी राज्यात दोन सभा घेणार आहेत.यावेळी त्यांच्यासोबत कोण कोणते नेते राहतील ( Bharat Yatra in Maharashtra 0 हे पाहणे गरजेचे ठरणार आहे.

मॉर्नींग वॉक, व्यायाम : भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी काँग्रसेच्या नेत्यांनी सकाळी अनेक कसरती केल्या ( Congress Leader Exercise ) आहेत. सकाळी मॉर्नींग वॉक असो किंवा व्यायाम, प्राणायम अशा अनेक कसरती काँग्रसेच्या नेत्यांनी केल्या आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने सांगितले की, तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून 7 सप्टेंबर रोजी सुरू झालेली यात्रा सोमवारी 61 व्या दिवशी महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. तेलंगणातील कामारेड्डी येथून ही यात्रा रात्री नऊच्या सुमारास महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील देगलूरमध्ये दाखल होईल. देगलूर येथील कलामंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ यात्रेतील सहभागींचे स्वागत समारंभ आयोजीत करण्याची योजना काँग्रेसच्या प्रदेश युनिटकडून आखण्यात आली आहे.

सभांचे आयोजन : सोहळ्यानंतर रात्री १० वाजता यात्रा पुन्हा सुरू होईल आणि सहभागींच्या हातात 'एकता मशाल' असेल, अशी माहिती मिळत आहे. मध्यरात्रीनंतर यात्रेत सहभागी असलेले नेते देगलूर येथील गुरुद्वारात उपस्थित राहतील आणि नंतर चिद्रावर मिल येथे रात्री विश्रांती घेतील. 8 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता यात्रा पुन्हा सुरू होईल. या दौऱ्यात राहुल गांधी राज्यात दोन सभांना संबोधित करणार आहेत. पहिला मेळावा 10 नोव्हेंबरला नांदेड जिल्ह्यात तर दुसरा मेळावा 18 नोव्हेंबरला बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे होणार आहे.

नांदेड जिल्ह्यात पाच दिवस राहणार : महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांत 382 किलोमीटरचे अंतर कापून ही यात्रा 20 नोव्हेंबरला मध्य प्रदेशात दाखल होणार आहे. महाराष्ट्रात ही यात्रा नांदेड जिल्ह्यात पाच दिवस राहणार असून तेथून ११ नोव्हेंबरला हिंगोली जिल्ह्यात प्रवेश करून १५ नोव्हेंबरला वाशिम जिल्ह्यात पोहोचेल. संविधान आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करणे हे या यात्रेचे उद्दिष्ट असे काँग्रसेच्या नेत्यांनी म्हटले आहे. गेल्या आठ वर्षांत देशाने भ्रष्टाचार, भीती आणि गरीबी पाहिली आहे, असा आरोप त्यांनी केला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यात देशातील समस्यांवर एकमुखाने चर्चेची मागणी केली.

शरद पवार उद्धव ठाकरेंना निमंत्रण : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना यात्रेतील सहभागाबाबत विचारले असता, काँग्रेसने दोन्ही नेत्यांना निमंत्रण पाठवले असून ते यात्रेत सहभागी होणार असल्याचे त्यांनी ( Sharad Pawar Uddhav Thackeray invitation ) सांगितले. या यात्रेत विविध क्षेत्रातील 100 हून अधिक प्रतिष्ठित लोक सहभागी होतील, असे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी सांगितले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.