Mother’s Day 2022 : हैदराबाद - आईची थोरवी वर्णन करण्यासाठी शब्दही अपूरे पडतात. तरी देखील अनेक लेखक, कवींनी आईची महती शब्दात वर्णन केली आहे. आईचे प्रेम, ममता, वात्सल्य, पाठिंबा, बळ यासाठी एक दिवस पुरेसा नसतोच. पण आईप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक दिवस साजरा केला जातो. तो म्हणजे मदर्स डे. आणि यावर्षी मदर्स डे हा 8 मे रोजी आहे.
मदर्स डे म्हणजेच मातृ दिन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील आईतुल्य व्यक्तिमत्त्वांना छानसे गिफ्ट देऊन तुम्ही त्यांच्यावरील प्रेमाची पोचपावती देऊ शकता. मग ती व्यक्ती कोणीही असू शकते- आई, सासू, आजी किंवा इतर कोणीही असो. त्यामुळे त्यांना नेमके ग्रिफ्ट काय द्यावे असा प्रश्न पडलाय? मग या काही आयडियाज तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील.
1. फुलांचा गुच्छ - अनेकदा काय गिफ्ट द्यावा, हा प्रश्न पडतो. अशावेळी फुलं उत्तम पर्याय ठरतात. तुम्ही रंगीबेरंगी फुलांचा गुच्छ गिफ्ट करु शकता किंवा रेड रोजेस किंवा आईला आवडणारी खासं फुलं गिफ्ट करुन तुम्ही तिच्या चेहऱ्यावर स्मित फुलवू शकता. सकाळी आई उठण्यापूर्वी तिच्या उशाशी फुलांचा गुच्छ ठेवून तुम्ही तिला सरप्राईज देऊ शकता, आणि आपले तिच्या प्रति असलेले प्रेम व्यक्त करु शकता.
2. स्पा अपॉईंटमेंट - वर्षानुवर्षे आपल्यासाठी राबणारी आई आणि दिवसभर आपल्यासाठी राबणारी आई आठवली की तिला स्वतःसाठी मोकळा वेळ कधी मिळाला हे आठवून पहा. सातत्याने आपल्या कुटुंबाचा, मुलाबाळांचा विचार करणाऱ्या आईला स्वतःचा विचार करण्याची, स्वतःसाठी वेळ काढण्याची संधी द्या. आईसाठी स्पा अपॉईंटमेंट बुक करुन तिला सरप्राईज द्या. त्यानिमित्ताने आईला स्वतःसाठी वेळ मिळेल, रिलॅक्स होता येईल आणि तिचा लूक बदलण्यासाठी मदत होईल. अशी ससप्राईज ही आपल्या आईला नक्कीच आवडेल.
3. डिनर डेट - आईच्या आवडत्या ठिकाणी तिला जेवायला घेऊन जाणे, ही देखील तिच्यासाठी उत्तम ट्रीट ठरेल. तुम्हालाही तिच्यासोबत छानसा वेळ घालवता येईल. मनमोकळ्या गप्पा होतील आणि आईला देखील खूप बरे वाटेल. तसेच स्वयंपाक करण्याला सुट्टी मिळेल, ते वेगळेच. आणि बाहेरचे जेवन आणि त्यानिमित्ताने होणारे चर्चा ही नक्कीच तुमच्या सर्वांसाठी एक मेजवाणी असेल.
4. कस्टमाईज मेसेजेस - तुम्ही जे काही आहात, त्यात तुमच्या आईचा मोठा वाटा आहे. त्यामुळे तिला आपण जितके देऊ तितके थोडेच. पण मदर्स डे निमित्त एखादा खास मनापासून लिहिलेला संदेश तिचे मन हेलावून टाकेल. हा संदेश आईला धन्यता देईल. त्यामुळे तुमच्या क्रिएटीव्हीला थोडी चालना द्या, इंटरनेटची थोडी मदत घ्या आणि आईसाठी खास संदेश लिहा. मग तो संदेश तुम्ही किचेन, पिलो, ग्रिटींग, फ्रेम कशावरही लिहून देऊ शकता.
5. ई-बुक रिडर - आईला जर वाचनाची आवड असेल तर तुम्ही तिला एखादे पुस्तक गिफ्ट करु शकता. पण ई-बुकची आयडिया जरा हटके आहे. त्यामुळे तिला तुम्ही ई-बुकही भेट करू शकता.
6. आवडती वस्तू - आपल्या आईला काही गोष्टी आवडत असतात. मात्र घरची घालाख्याची परिस्थिती आणि काटकसरीचा संसार. यामुळे त्या घेण्याचे ती टाळत असते. अश्या वेळी आपण मदर्स डे निमित्ताने तिला आवडणारी एखादी वस्तू देऊन तिला आंनदी करू शकता.
यंदा मदर्स डे निमित्त थोडा वेगळा विचार करुन आईला काहीतरी हटके गिफ्ट द्या. आईवर प्रेमाचा वर्षाव करा आणि तिला स्पेशल ट्रीटमेंट द्या. येणाऱ्या मदर्स डेच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा....
हेही वाचा - 1 May Maharashtra Day : महाराष्ट्र दिनानिमित्ताने जाणून घेऊया मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्मितीची यशोगाथा