ETV Bharat / bharat

West Bengal Panchayat Election 2023: हिंसाचाराचा भडका उडाल्याने बंगालमध्ये 696 बूथवर आज फेर मतदान; निवडणूक आयोगाकडून चोख सुरक्षा व्यवस्था - Re voting West Bengal Panchayat Election 2023

पश्चिम बंगालमधील 696 बूथवर आज फेर मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाकडून चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, मुर्शिदाबाद परिसरात पुन्हा एकदा दगडफेकीची घटना समोर आली आहे.

West Bengal Panchayat Election 2023
पश्चिम बंगाल पंचायत निवडणूक २०२३
author img

By

Published : Jul 10, 2023, 9:19 AM IST

Updated : Jul 10, 2023, 11:03 AM IST

कोलकाता : पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमधील खारग्राममध्ये फेर मतदानापूर्वी दगडफेकीची घटना समोर आली आहे. पोलिसांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यातील 696 बूथवर आज फेरमतदान होणार आहे. निवडणूक निष्पक्ष आणि शांततेत पार पडावी यासाठी निवडणूक आयोगाकडून व्यापक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. बंगाल निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, परिसरात पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. पोलिसांच्या वाहनाचीही तोडफोड करण्यात आली. पश्चिम बंगाल निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केले की, आज 696 बूथवर पुन्हा मतदान घेण्यात येईल, जेथे शनिवारी झालेल्या पंचायत निवडणुकीदरम्यान मतदान अवैध घोषित करण्यात आले होते.

  • #WATCH | West Bengal: Police personnel deployed in Murshidabad's Khargram after stone-pelting was reported in the area. A police vehicle was also vandalised.

    State Election Commission yesterday announced that re-polling will be held on July 10 in 696 booths where voting for the… pic.twitter.com/zDlYwbGUyz

    — ANI (@ANI) July 9, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

बूथवर पुनर्मतदानाचे आदेश : राज्याच्या ग्रामीण भागातील 73,887 जागांसाठी शनिवारी झालेल्या मतदानात सुमारे 61,636 मतदारांनी 61,636 मतदान केंद्रांवर मतदान केले. त्यांनी 2.06 लाख उमेदवारांचे भवितव्य ठरवले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने (एसईसी) रविवारी संध्याकाळी एक बैठक घेतली. मतदानात छेडछाड आणि हिंसाचाराच्या अहवालांची दखल घेतली आणि आदेश पारित केला. या घटनांचा परिणाम अनेक ठिकाणी मतदानावर झाला. ज्या बूथवर पुनर्मतदानाचे आदेश देण्यात आले आहेत, तेथे किमान चार केंद्रीय पोलीस दलाचे कर्मचारी तैनात केले जातील.

पंचायत निवडणुकीदरम्यान हिंसाचार : पुनर्मतदान जाहीर झालेल्या जिल्ह्यांपैकी मुर्शिदाबादमध्ये सर्वाधिक 174 बूथ आहेत, त्यानंतर मालदामध्ये 110 बूथ आहेत. पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस रविवारी नवी दिल्लीला रवाना झाले, जिथे ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन राज्यातील पंचायत निवडणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचाराचा अहवाल सादर करतील अशी अपेक्षा आहे.

हिंसाचारात 15 जणांचा मृत्यू : राज्यात शनिवारी मतदानादरम्यान झालेल्या हिंसाचारात 15 जणांचा मृत्यू झाला होता. अधिकाऱ्याने सांगितले, राज्यपाल हे दिल्लीला जात आहेत. त्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन शनिवारी पश्चिम बंगालमध्ये झालेल्या पंचायत निवडणुकांचा अहवाल सादर करायचा आहे. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बोस आज सकाळी शाह यांची भेट घेतील अशी शक्यता आहे.

मतदानादरम्यान परिस्थितीचा आढावा : ते म्हणाले की, राज्यपालांनी ग्रामीण निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हिंसाचारग्रस्त भागांना भेट देऊन अहवाल तयार केला आहे. शनिवारी मतदानादरम्यान परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्यपालांनी प्रामुख्याने उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेटी दिल्या. कोलकाता येथील राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर भाजप समर्थकांनी निदर्शने केली. निवडणुका शांततेत पार पाडण्यात कथित 'अकार्यक्षमते'बद्दल विरोधात घोषणाबाजी केली. यादरम्यान परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली होती. पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यात, भाजप कार्यकर्त्यांनी नंदकुमार येथे हल्दिया-मेचेडा राज्य महामार्ग रोखला. श्रीकृष्णपूर हायस्कूलमधील मतमोजणी केंद्रात मतपेट्यांशी छेडछाड केल्याचा आरोप केला.

हेही वाचा :

  1. West Bengal Violence : 'आम्हाला संवेदनशील बूथचे तपशील दिले नाहीत', हिंसाचारानंतर बीएसएफचे निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
  2. Panchayat Elections 2023 : पश्चिम बंगालमध्ये मतदानाला सुरुवात; मतदान केंद्रावर जाळपोळ, आतापर्यंत पाच कार्यकर्त्यांचा मृत्यू
  3. West Bengal Violence : ममता सरकारला झटका, पंचायत निवडणुकीत केंद्रीय सुरक्षा दलाची तैनाती योग्य - सर्वोच्च न्यायालय

Last Updated : Jul 10, 2023, 11:03 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.