ETV Bharat / bharat

निवडणूक आयोगाच्या आदेशाविरोधात ममतांचे धरणे आंदोलन!

author img

By

Published : Apr 13, 2021, 12:29 PM IST

जातीयवादी वक्तव्ये आणि केंद्रीय सुरक्षा दलांविरोधी वक्तव्ये केल्यामुळे निवडणूक आयोगाने ममतांवर कारवाई केली होती. १२ एप्रिल रात्री आठ वाजेपासून, १३ एप्रिल रात्री आठ वाजेपर्यंत ममतांना प्रचारास बंदी करण्यात आली आहे...

West Bengal CM Mamata sits on dharna to protest EC's decision
निवडणूक आयोगाच्या आदेशाविरोधात ममतांचे धरणे आंदोलन!

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी गांधी मूर्तीजवळ धरणे आंदोलन केले. निवडणूक आयोगाने सोमवारी त्यांच्यावर २४ तासांसाठी प्रचार करण्याची बंदी लागू केली होती. या आदेशाविरोधात त्यांनी आंदोलन केले.

जातीयवादी वक्तव्ये आणि केंद्रीय सुरक्षा दलांविरोधी वक्तव्ये केल्यामुळे निवडणूक आयोगाने ममतांवर कारवाई केली होती. १२ एप्रिल रात्री आठ वाजेपासून, १३ एप्रिल रात्री आठ वाजेपर्यंत ममतांना प्रचारास बंदी करण्यात आली आहे. भाजपाच्या नेत्यांनी ममता यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. ममतांनी लोकप्रतिनिधी कायदा आणि आचारसंहितेच्या तरतुदींचे उल्लंघन केल्याचे निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.

काय म्हणाल्या होत्या ममता?

विद्यापीठांसाठी कन्याश्री शिष्यवृत्ती आहे. अनुसूचित जाती आणि जमातींसाठी शिक्षाश्री आहे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी स्वामी विवेकानंद शिष्यवृत्ती आहे. अल्पसंख्यक समुदायातील माझ्या बंधू आणि भगिनींसाठी, एक्यश्री आहे. मी 2 कोटी 35 लाख जणांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळवून दिला आहे. भाजपाकडून पैसे घेतलेल्या पक्षांना मतदान करू नका, मी तुम्हाला हात जोडून विनंती करते. मतांचे विभाजन होऊ देऊ नका, असे ममता बॅनर्जी सभेत म्हणाल्या होत्या.

काय म्हणाले निवडणूक आयोग?

ममता बॅनर्जी एक मुख्यमंत्री आहेत. त्यांनी आचारसंहिता तसेच लोकप्रतिनिधी कायदा 1951 च्या कलम 123 (3) आणि 3 अ आणि आयपीसी 1860 च्या कलम 166, 189 आणि 505 चे उल्लंघन केले आहे. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडेल आणि निवडणूक प्रक्रियेला खीळ बसू शकेल अशी अत्यंत भडक विधाने ममता बॅनर्जी यांनी केली आहेत, असे निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.

पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यांमध्ये विधानसभा निवडणूक पार पडणार असून, २ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.