कोलकाता - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मालमत्तेच्या वाढीबाबत कलकत्ता उच्च न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. खुद्द ममता यांनी या प्रकरणी खुलासा केला. माझ्या किंवा माझ्या कुटुंबाच्या नावावर सरकारी जमिनीवर Mamata Banerjee criticized BJP अतिक्रमण केल्याचा पुरावा आढळल्यास, चौकशी करा आणि बुलडोझरने सर्व जमीनदोस्त करा, अशी संतप्त प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी दिली आहे. मी मुख्य सचिवांना चौकशी करण्यास सांगितले आहे, असेही ममत बॅनर्जी म्हणाल्या. मी मुख्य सचिवांना चौकशी करण्यास सांगितले आहे. जर कोणी माझ्या कुटुंबाच्या नावावर जमीन बळकावल्याची तक्रार केली तर ते त्याला उत्तर देतील, असे मुख्यमंत्री म्हणाल्या. शिवाय आपली प्रतिमा मलिन केल्या जात असल्याचे सांगत ममता बॅनर्जींनी ताशेरे ओढले आहे.
पश्चिम बंगाल कोळसा तस्करी घोटाळा, पश्चिम बंगाल पशु तस्करी घोटाळ्याचा पैसाही कालीघाटात पाठवण्यात आल्याचे वारंवार सांगितले जात आहे. तुमच्यात हिम्मत असेल आरोप सिद्ध करा, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला आहे. दरम्यान ममता बॅनर्जींनी भाजपावर टीका केली आहे. भाजपा सूडाचे राजकारण करत आहे. मी समाजसेवेसाठी राजकारणात आले आहे. असे घाणेरडे राजकारण मी पाहिले असते तर मी राजकारण आधीच सोडले असते. कोणाचा कोळसा? कोणाची गाय? सर्व केंद्रीय गृहमंत्र्यांच्या जबाबदारीत आहे. तुम्हाला आमची मदत हवी असेल तर, सांगा आम्ही मदत करू. उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली येथून गाड्या येत आहेत. या सर्वांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही ममता बॅनर्जी यांनी केली आहे.