ETV Bharat / bharat

वाराणसीतील वीणकर मोदींना भेट देणार गौतम बुद्धांचा उपदेश असलेलं वस्त्र - वाराणसी लेटेस्ट न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 नोव्हेंबरला वाराणसीला भेट देणार आहेत. बनारसमधील बच्चे लाल मौर्या या वीणकराने गौतम बुद्ध यांचा उपदेश असलेले वस्त्र मोदींना भेट म्हणून देण्यासाठी खास तयार केले आहे.

वस्त्र
वस्त्र
author img

By

Published : Nov 28, 2020, 3:07 PM IST

Updated : Nov 28, 2020, 5:46 PM IST

वाराणसी - पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला संसदीय मतदारसंघ वाराणसीला येत्या दोन दिवसांमध्ये भेट देणार असल्याची माहिती आहे. त्यांच्या स्वागतासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. वाराणसी दौऱ्यामध्ये पंतप्रधान सारनाथला भेट देणार आहेत. गौतम बुद्ध यांनी आपला पहिला उपदेश याच ठिकाणी दिला होता. यातच बनारसमधील बच्चे लाल मौर्या या वीणकराने गौतम बुद्ध यांचा उपदेश असलेले वस्त्र मोदींना भेट म्हणून देण्यासाठी खास तयार केले आहे. त्यावर 'बुद्धम् शरणम् गच्छामि', असे लिहिलेले आहे. तसेच वस्त्रावर बोधी वृक्षाचे पानही आहे. गौतम बुद्धांना पिंपळाच्या वृक्षाखाली 'बौद्धत्व' प्राप्त झाले होते. म्हणून त्या वृक्षाला 'बोधी वृक्ष' असे म्हणतात.

बौद्ध धर्मात प्रचलित रंगांचा वापर करून मेहरूण रंगाच्या कपड्यावर पिवळ्या रेशीम धाग्याने बोधी वृक्षाचे पान आणि बुद्धम् शरणम् गच्छमिचा संदेश लिहला आहे. पंतप्रधान देवदिवाळीच्या पर्वाला वाराणसीमध्ये येत आहेत. वाराणसीमध्ये देवदिवाळी उत्सव दरवर्षी साजरा होतो. प्रत्येक वर्षी हजारो पर्यटक वाराणसीला येतात आणि नौकाविहारचा आनंद घेतात. नाविकांच्या वर्षभरातील कमाईचा एक मोठा हिस्सा यातून येतो.

weavers of varanasi will present shawl to prime minister modi
वीणकर बच्चे लाल मौर्या देणार मोदींना खास भेट

पुरातन शहर वाराणसी -

वाराणसी हे कला आणि डिझाइनचे एक प्रमुख केंद्र आहे. ब्रिटिश राजवटीतील लष्करी छावणीची स्मशानभूमी ही वाराणसीच्या कला व शिल्पांचे स्थान आहे. हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मियांचे सर्वाधिक लोकप्रिय तीर्थस्थान असलेले तसेच राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक दृष्ट्या हजारो वर्षांचा अखंड इतिहास आणि परंपरा असलेले वाराणसीइतके पुरातन शहर भारतात अन्यत्र क्वचितच आढळेल.

हेही वाचा - सत्याचा अहंकारावर विजय होतो, शेतकरी आंदोलनावरून राहुल गांधींचा हल्लाबोल

Last Updated : Nov 28, 2020, 5:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.