नवी दिल्ली : उत्तर भारतात पुराच्या पाण्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये दरड कोसळल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांची अडचण चांगलीच वाढली असताना आता भारतीय हवामान विभागाने पुढील पाच दिवसात उत्तराखंडमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर उत्तर प्रदेशात पुढील दोन दिवसात अति मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यताही भारतीय हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आली आहे.
कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर होणार मुसळधार : पश्चिम भारतात पुढील पाच दिवस कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील दोन दिवस गुजरातमध्ये हीच स्थिती राहणार आहे. दक्षिण भारतात हलका ते मध्यम पाऊस पडेल. पुढील तीन दिवस कर्नाटक किनारपट्टी, दक्षिण कर्नाटक आणि केरळमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. 'तामिळनाडू, आंध्र प्रदेशातील किनारी प्रदेश आणि तेलंगणात पुढील दोन दिवसापर्यंत मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
-
#WATCH | Himachal Pradesh: Clouds seen over mountains in Mandi. pic.twitter.com/AbWB3sCNM5
— ANI (@ANI) July 14, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | Himachal Pradesh: Clouds seen over mountains in Mandi. pic.twitter.com/AbWB3sCNM5
— ANI (@ANI) July 14, 2023#WATCH | Himachal Pradesh: Clouds seen over mountains in Mandi. pic.twitter.com/AbWB3sCNM5
— ANI (@ANI) July 14, 2023
या राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज : हिमाचल प्रदेशात पुढील पाच दिवस काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. उत्तर हरियाणामध्ये पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्ये 14 आणि 17 जुलैला वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. उत्तराखंडमध्ये पुढील पाच दिवसात अति मुसळधार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यताही भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
-
#WATCH Flood situation in Delhi | Heavy rainfall & increase in Yamuna river's water level triggers waterlogging in parts of Delhi; visuals from near Supreme Court. pic.twitter.com/45SViam4lQ
— ANI (@ANI) July 14, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH Flood situation in Delhi | Heavy rainfall & increase in Yamuna river's water level triggers waterlogging in parts of Delhi; visuals from near Supreme Court. pic.twitter.com/45SViam4lQ
— ANI (@ANI) July 14, 2023#WATCH Flood situation in Delhi | Heavy rainfall & increase in Yamuna river's water level triggers waterlogging in parts of Delhi; visuals from near Supreme Court. pic.twitter.com/45SViam4lQ
— ANI (@ANI) July 14, 2023
ईशान्य भारतात मुसळधार पाऊस : चीनच्या धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे दरवर्षी आसाम, अरुणाचल प्रदेशात महापूर येऊन जनजीवन विस्कळीत होते. मात्र पावसाच्या पाण्याचाही फटका या नागरिकांना मोठ्या प्रमाणात बसतो. पूर्व आणि लगतच्या ईशान्य भारतात मुसळधार पावसाची शक्यता आहे. यात आसाम, अरुणाचल प्रदेश आणि बिहारमध्ये पुढील दोन दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर पाऊस ओसरणार असल्याचेही भारतीय हवामान विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. पुढील पाच दिवस ओडिशात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर नागालँड आणि मणिपूरमध्ये पुढील चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
-
#WATCH | Ashutosh Garg, Deputy Commissioner, Kullu says, "Our relief and rescue work is being done on war footing in the entire district...Around 1800 plus transformers were affected by the floods out of which 50% have been restored by the Electricity Department...road… pic.twitter.com/h3nnib5bfq
— ANI (@ANI) July 13, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | Ashutosh Garg, Deputy Commissioner, Kullu says, "Our relief and rescue work is being done on war footing in the entire district...Around 1800 plus transformers were affected by the floods out of which 50% have been restored by the Electricity Department...road… pic.twitter.com/h3nnib5bfq
— ANI (@ANI) July 13, 2023#WATCH | Ashutosh Garg, Deputy Commissioner, Kullu says, "Our relief and rescue work is being done on war footing in the entire district...Around 1800 plus transformers were affected by the floods out of which 50% have been restored by the Electricity Department...road… pic.twitter.com/h3nnib5bfq
— ANI (@ANI) July 13, 2023
पश्चिम बंगाल आणि सिक्कीम आणि मेघालयात मुसळधार : पश्चिम बंगालमध्ये 15 जुलैला वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. 13 आणि 14 जुलै रोजी पश्चिम बंगाल आणि सिक्कीम आणि मेघालयात वेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टी होईल. पुढील दोन दिवस मध्य भारतात हलका ते मध्यम तर मध्य प्रदेशात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मात्र त्यानंतर 15 ते 16 जुलैपर्यंत पावसाचा जोर कमी होऊन पुन्हा 17 जुलैपासून पुन्हा वाढणार असल्याचे भारतीय हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा -