नवी दिल्ली : काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. जनतेचा आवाज दाबला जाऊ शकत नाही, असे ते म्हणाल्या आहेत. राहुल यांनी विचारलेले प्रश्न आता देशभर गाजतील आणि भाजपवाल्यांना आता उत्तरे द्यावी लागतील असही प्रियंका म्हणाल्या आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांचे लोकसभेचे सदस्यत्व रद्द केल्यावर प्रियंका गांधी यांनी शनिवारी ट्विट केले की, 'ज्या प्रश्नांसाठी राहुल गांधींवर हल्ला केला जात आहे. जनतेने निवडून दिलेल्या लोकसेवकाने जनतेच्या वतीने प्रश्न विचारले असता, अदानी-सेवकाने लोकसेवकाचा आवाज दाबण्याचा डाव रचला. पण जनतेचा आवाज दाबता येत नाही. हे प्रश्न आता देशभर गाजतील आणि त्यांना उत्तरे द्यावी लागतील असही त्या म्हणाल्या आहेत.
न्यायाधीशाने तुम्हाला दोन वर्षांची शिक्षा दिली नाही : याआधीही प्रियांकाने शुक्रवारी एकामागोमाग एक ट्विट करत मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. प्रियंका म्हणाली होती, 'पीएम मोदी, तुमच्या गुंडांनी शहीद पंतप्रधानांच्या मुलाला मीर जाफर देशद्रोही म्हटले आहे. तुमच्या एका मुख्यमंत्र्यांनी प्रश्न उपस्थित केला की राहुल गांधींचे वडील कोण आहेत? ते म्हणाले की, काश्मिरी पंडितांच्या प्रथेनुसार, वडिलांच्या मृत्यूनंतर मुलगा पगडी घालतो, आपल्या कुटुंबाची परंपरा कायम ठेवतो. संपूर्ण कुटुंबाचा आणि काश्मिरी पंडित समाजाचा अपमान करत तुम्ही खचाखच भरलेल्या संसदेत नेहरूंचे सरनेम का ठेवत नाही, असे विचारले, पण एकाही न्यायाधीशाने तुम्हाला दोन वर्षांची शिक्षा दिली नाही. तुम्हाला संसदेतून अपात्र ठरवले नाही असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
या प्रश्नावर तुम्ही संतापलात? : प्रियंका गांधी म्हणाल्या, 'खऱ्या देशभक्ताप्रमाणे राहुल गांधींनी अदानींकडून होणाऱ्या लुटीवर प्रश्न उपस्थित केला. तसेच, त्यांनी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीला प्रश्न केला. तुमचा मित्र गौतम अदानी देशाच्या संसदेपेक्षा आणि भारतातील महान लोकांपेक्षा मोठा झाला आहे का, असा सवाल जेव्हा उपस्थित करण्यात आला. या प्रश्नावर तुम्ही संतापलात? असही प्रियंका गांधी म्हणाल्या आहेत.
सत्तेच्या हुकूमशहापुढे आम्ही कधीच झुकलो नाही : तुम्ही माझ्या कुटुंबाला कुटुंबवादी म्हणता. परंतु, माझ्या कुटुंबाने आपल्या रक्ताने भारतातील लोकशाहीचे रक्षण केले आहे. ज्याला तुम्ही नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहात त्या कुटुंबाने भारतातील लोकांचा आवाज उठवला आणि पिढ्यानपिढ्या सत्यासाठी लढा दिला आहे. आमच्या रक्तामध्ये संघर्ष आहे असही प्रियंका गांधी म्हणाल्या आहेत. दरम्यान, सत्तेच्या हुकूमशहापुढे आम्ही कधीच झुकलो नाही आणि कधी झुकणारही नाही असही प्रियंका यांनी ठणकावून सांगितले आहे.
हेही वाचा : Rahul Gandhi : माझ्या भाषणाला घाबरूनच खासदारकी काढली, माफी मागायला मी सावरकर नाही - राहुल गांधी