कोलकाता : येत्या विधानसभा निवडणुकांच्या मतदानावेळी, बुरखा घातलेल्या मतदारांची तपासणी करण्यासाठी महिला सीपीएफ कर्मचारी तैनात करावेत अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे. मुस्लीमबहुल भागांमध्ये होणाऱ्या मतदानावेळी अशी तपासणी करण्यात यावी, अशी मागणी पक्षाने निवडणूक उपायुक्तांकडे पत्र लिहीत केली आहे.
मुस्लीम भागामध्ये मतदानावेळी महिला बहुतांश करुन बुरख्यामध्ये येतात. त्यावेळी सीपीएफ जवान त्यांची ओळख तपासू शकत नाहीत. त्यामुळेच यासाठी संबंधित विभागांमध्ये पुरेशा प्रमाणात महिला सीपीएफ जवान तैनात करावेत अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे.
मतदारांमध्ये अचानक वाढ..
बांगलादेश सीमेच्या जवळच्या भागांमध्ये मतदारांची संख्या अचानकपणे वाढल्याचा आरोप भाजपने केला आहे. अल्पसंख्याक (मुस्लीम) रहिवासी असणाऱ्या भागांमध्ये ही वाढ दिसून येत असल्याचेही या पत्रात म्हटले आहे. उदाहरण म्हणून, १४९ एसी कसबा वॉर्ड नंबर ६६मधील मतदारांमध्ये तब्बल दहा टक्के वाढ झाली आहे. विभागातील मृत मतदारांना यादीतून हटवले नसल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे, असेही भाजप म्हणाले.
हेही वाचा : पाकिस्तानातून परतलेली गीता आमची मुलगी असल्याचा देशातील चाळीस कुटुंबांचा दावा